31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमुंबईतील डॉ.निलेश दोशी अमेरिकेतील चार हजार डॉक्टरांना करणार संबोधित!

मुंबईतील डॉ.निलेश दोशी अमेरिकेतील चार हजार डॉक्टरांना करणार संबोधित!

जून २०२४ मध्ये बाल्टीमोर या ठिकाणी पार पडणार बैठक

Google News Follow

Related

आयुर्वेद ही भारतीय उपखंडातील एक प्राचीन औषध प्रणाली असून आजच्या युगातही आयुर्वेद पद्धतीचा विकास झपाट्याने झाला आहे. आयुर्वेद पद्धतीद्वारे उपचारांबाबत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून रोज नवनवीन शोध आणि त्यावरील उपचार शोधले जात आहेत.यामध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन (एएससीआरएस) कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, आगामी एएससीआरएस २०२४ ची वार्षिक वैज्ञानिक बैठक बाल्टीमोर (यूएसए) याठिकाणी जून महिन्यात पार पडणार असून या बैठकीसाठी डॉ. नीलेश दोशी (एमडी आयुर्वेदिक सर्जरी) यांना आमंत्रित करण्यात आले आहे.डॉ.नीलेश दोशी हे मूळव्याध, फिशर आणि फिस्टुलाचे आयुर्वेदिक विशेषतज्ञ एमडी सर्जन असून पिलोनिडल सायनसवरील क्षरसूत्र उपचारावर ते बोलणार आहेत.एएससीआरएसकडून घेण्यात येणाऱ्या बैठकीत रुग्णांचे आजार आणि त्यावरील उपचार याबाबत माहिती दिली जाते.या बैठकीला जगभरातील आयुर्वेदिक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ हे उपस्थित असणार आहेत.

मुंबईच्या मालाड येथील देवांगी हॉस्पिटलातील डॉ.नीलेश दोशी (एमडी आयुर्वेदिक सर्जरी) यांना अमेरिकन सोसायटी ऑफ कोलन अँड रेक्टल क्रिएशन इन यूएसए तर्फे पारंपारिक मिनिमल सिनेक्टोमीच्या केश मालिकेसाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.जून २०२४ मध्ये बाल्टीमोर (यूएसए) या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे तसेच या संस्थेला १२५ वर्षे पूर्ण होणार आहेत.डॉ.नीलेश दोशी यांना या बैठकीला उपस्थित राहणार असून अमेरिकेतील सुमारे ४ हजार डॉक्टरांना संबोधित करणार आहेत, ज्यामध्ये आयुर्वेदिक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.डॉ नीलेश दोशी यांना आयुर्वेदातील अनेक वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. अनेक रुग्णालयांशी संबंधित असण्यासोबतच ते इतर वैद्यकीय संस्थांशीही संबंधित आहेत.

हे ही वाचा:

धोनीच्या षटकाराने चेन्नई पराभूत!

तृणमूलनेता पोलिसांच्या ताब्यात; आठवीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप

अफगाणिस्तानमध्ये भीषण पाऊस, पुरात ६८ जणांचा मृत्यू

किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच थांबण्याच्या सूचना

२०२४-एएससीआरएस वार्षिक वैज्ञानिक सभेचा उद्देश कोलन, गुदाशय आणि गुदव्दाराच्या विकारांच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी संशोधन आणि शिक्षणाद्वारे विज्ञानाची प्रगती करून उच्च दर्जाची रुग्ण काळजी सुनिश्चित करणे हा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा