24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषडॉ. दाभोलकर हत्येला ९ वर्षे, असा होता जीवनप्रवास

डॉ. दाभोलकर हत्येला ९ वर्षे, असा होता जीवनप्रवास

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आज, २० ऑगस्ट २०२२ रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत

Google News Follow

Related

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आज, २० ऑगस्ट २०२२ रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. २० ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ हत्या करण्यात आली होती. मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून वीरेंद्र तावडे हा या कटाचा मास्टरमाइंड असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाल्याचे सीबीआयने याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जीवनप्रवास

​डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अशी होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. डॉ. दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी साताऱ्यामधील माहुली येथे झाला. सातारा, सांगली येथे त्यांचं शिक्षण झालं. दाभोलकर हे उत्तम कबड्डीपटू देखील होते.

बाबा आढाव यांच्या ‘एक गाव- एक पाणवठा’ या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रीय सहभाग होता. साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना या साप्ताहिकाचे ते १९९८ पासून संपादक होते. अंधश्रद्धा निर्मुलनासाठी त्यांनी लोकप्रबोधनाचे मोठे काम केले होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.

हे ही वाचा:

‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’

२६/११ प्रमाणे सोमालियात हॉटेलात घुसले अतिरेकी

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, अंधश्रद्धा विनाशाय, ऐसे कैसे झाले भोंदू, ठरलं… डोळस व्हायचंच, तिमिरातुनी तेजाकडे, भ्रम आणि निरास, विचार तर कराल? असे अनेक लेखन त्यांनी केलं आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला होता.

पृथ्वीराज चव्हाण यांच्याच काळात ही हत्या झाली. त्यावेळी तपासात दिरंगाई झाली आणि नंतर त्याचे खापर फडणवीस सरकारवर फोडण्याचा प्रयत्न झाला. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी ही हत्या केल्याचा अंदाज तपासाआधीच व्यक्त करण्यात आला होता. यावरून जाणीवपूर्वक या हत्येचा रोख हिंदुत्ववाद्यांकडे वळविण्याचा प्रयत्नही झाल्याची चर्चा होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा