भारतातील ‘हे’ रेल्वे स्थानक चालते १००% सौर उर्जेवर!

भारतातील ‘हे’ रेल्वे स्थानक चालते १००% सौर उर्जेवर!

पर्यावरण पूरक रेल्वे स्थानक बनवण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. चेन्नईतील एक अत्यंत महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आता सौर उर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक झाले आहे. दिवसाच्या वेळी या स्थानकाला आवश्यक असणारी ऊर्जेची सर्व गरज ही सौर ऊर्जेतून भागवली जाते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधीची घोषणा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय रेल्वेच्या या कामगिरीसाठी कौतुकाची थाप दिली आहे.

चेन्नईतील प्रसिद्ध अशा पुराची थलाईवा डॉ. एम. जी. रामचंद्रन सेंट्रल स्थानक हे १००% सौर उर्जेवर कार्यान्वयित असलेले स्थानक बनले आहे. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. या स्थानकाला दिवसाच्या कालावधीत आवश्यक असलेली विजेची दैनंदिन गरज ही संपूर्णपणे सौर ऊर्जेतून भागवली जाते. रेल्वे स्थानकावर सोलर पॅनेल्स बसवून त्याच्या आधारे स्थानकाची ऊर्जेची गरज पूर्ण केली जाते. या स्थानकावर १.५ मेगा वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. ज्यातून दिवसाच्या वेळेची स्थानकाची ऊर्जेची गरज भागवली जाते.

हे ही वाचा:

… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!

शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी या स्थानकाचा फोटो ट्विट करत या संबंधीची माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या गोष्टीचे कौतुक केले आहे. “सौर ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत पुराची थलाईवा डॉ. एम. जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानकाने दाखवलेला मार्ग पाहून आनंद झाला” असे मोदींनी म्हटले आहे.

Exit mobile version