भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळापासून त्या कर्करोगाच्या दुर्धर अजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मधल्या काळात त्यांनी आपल्या असाध्य आजारावर वैद्यकीय उपचारांनी मातही केली होती. मात्र, अखेर त्यांना मृत्यूने गाठलं. सकाळी ५.३० च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवार, १७ जुलै रोजी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मंगला नारळीकर या प्रख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. १७ मे १९४३ रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी १९६२ मध्ये बीएची पदवी संपादन केली. पुढे १९६४ साली त्या गणित विषयात एम ए झाल्या. त्या परीक्षेत त्या विद्यापीठामध्ये प्रथम आल्या होत्या. त्यामुळे त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक मिळाले होते.
हे ही वाचा:
वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग
दुगारवाडी धबधब्यात १७ वर्षीय तरुण गेला वाहून
आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
आशियाई ऍथलीट्स चॅम्पियनशिपमध्ये पदकतालिकेत भारत तिसरा
डॉ. मंगला नारळीकर यांची अध्यापकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (मुंबई), केंब्रिज विद्यापीठ, मुंबई आणि पुणे विद्यापीठ (सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) आदी नामवंत संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन आणि संशोधनाची जबाबदारी पार पाडली आहे. १९७४ ते १९८० या काळात त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्स्टिट्युटल येथे संशोधन करुन गणित विषयात पदवी मिळवली.