भारतीय गायींच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल

भारतीय गायींच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल

गीर, कंकरेज, सहिवाल, ओंगोल अशा अस्सल भारतीय जमातींच्या गाईंचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‘इंडीगौ’ ही भारतातील पहिली वहिली पशु जेनोमिक चीप तयार केली आहे. भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी शुक्रवार, १३ ऑगस्ट रोजी या इंडीगौ चीपचे लोकार्पण केले आहे.

हे ही वाचा:

ठाणे जिल्हयातील पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील घेणार जनतेचा आशीर्वाद

एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?

…तरच गाड्यांना परवाने द्या! कोर्टाने सुनावले…वाचा

संसदेतल्या गोंधळाचे ‘पोस्टमॉर्टम’! वाचा काय घडले

ही चीप १००% भारतीय बनावटीची आहे. हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांनी ही चीप तयार दिली आहे. कॅटल चीप अर्थात पशु चीप प्रकारातील ही जगातील सर्वात मोठी चीप आहे. या चीप मध्ये एकूण ११,४९६ मार्कर आहेत. अस्सल भारतीय जमातीच्या गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनेचे यश अधोरेखित केले. ‘भारतासाठी हा तीन प्रकारचे यश साजरा करण्याचा क्षण आहे. भारताच्या गोधन संपदेचे यश, भारतीय वैज्ञानिकांच्या क्षमतेचे यश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे यश!’ असे जितेंद्र सिंह म्हणाले.

Exit mobile version