डॉ. डेरेंनी गाडी चालविली, तेव्हा महिला सायन रुग्णालयासमोर रस्त्यावर झोपली होती!

महिलेचा रात्री १२:३० वाजता मृत्यू झाला, परंतु रुग्णालयाने महिलेचा मृत्यूची माहिती पोलिसांना शनिवारी दिली

डॉ. डेरेंनी गाडी चालविली, तेव्हा महिला सायन रुग्णालयासमोर रस्त्यावर झोपली होती!

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातानंतर संपूर्ण राज्यातील पोलीस सतर्क झाले आहे,कुठलाही अपघात असो,तपासात कुठलीही त्रुटी राहता कामा नये, यासाठी राज्यातील सर्व पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
मुंबईतील सायन रुग्णालयाच्या आवारात झालेल्या अपघाताच्या बाबतीत सायन पोलिसांकडून अपघाताचा सर्व बाजूनी तपास केला जात आहे. या अपघातात सायन रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टरच आरोपी असल्यामुळे सायन पोलिसांकडून तपासात अधिकच काळजी घेतली जात आहे.

सायन रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी रात्री झालेल्या अपघाताचा व्हिडीओ (सीसीटीव्ही) समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये बळीत महिला ही रस्त्यावर झोपलेली दिसत असून तिच्या अंगावरून मोटार गेल्याचे व्हिडीओ फुटेज मध्ये दिसत आहे. या अपघाता प्रकरणी सायन पोलिसानी लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (सायन रुग्णालय)
न्यायवैधक विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश डेरे यांना अटक करण्यात आली होती. एक महिला सायन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रस्त्यावर झोपते कशी, येथील सुरक्षा यंत्रणा काय करत होती ? या अपघातापूर्वी या महिलेला रस्त्यावरून का उठवले गेले नाही, या सर्व अपघातात नेमकी चुक कुणाची आहे असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

सायन रुग्णालय आवारात झालेल्या अपघातात सदर महिला ही रुग्णालयाच्या आवारातील रस्त्यावर झोपलेली होती, या अपघातापूर्वी सुरक्षा रक्षकानी तिला तेथून उठविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु महिला जागची हलली नाही, त्यानंतर डॉ. डेरे हे आपले वाहन घेऊन निघाले व वाहनांच्या उंचीमुळे सदर महिला त्यांना दिसली नाही.आणि त्यांच्या वाहनाचे डाव्या चाकाखाली ही महिला आली.व्हिडीओमध्ये असे दिसते की, डॉ. डेरे हे स्वतः वाहन चालवत होते, व मोटारीचा स्पीड देखील खूप कमी होता, डॉ. डेरे आणि रुग्णालय कर्मचारी यांनी या महिलेला तात्काळ उपचारासाठी वॉर्ड क्रमांक २० मध्ये हलवले. डॉ. डेरे आणि रुग्णालय प्रशासनाने हा अपघात लपविण्यासाठी पोलिसांना रात्री ११ वाजता रुग्णसंदेश दिला, त्यात त्यांनी म्हटले की, एक महिला बेशुद्ध अवस्थेत ओपीडी जवळ मिळून आली, तिच्या डोक्याला जखमा आहे, तिला उपचारासाठी वॉर्ड क्रमांक २० मध्ये दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

अग्निवीरांना आता मिळणार करसवलतीचा लाभ

२० बंगलादेशींना ८ महिने तुरुंगवास

वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करण्यासाठी पैसे पुरवणाऱ्याला अटक

मुलींची बाजी, कोकण ‘गुणवत्ता यादीत’ अव्वल

सायन पोलीस ठाण्याचे अधिकारी जेव्हा वार्ड क्रमांक २० मध्ये पोहोचले त्या वेळी महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांना तीचा जबाब नोंदविता आला नाही. दर महिला जिवंत आहे की मृत झाली हे देखील कळत नव्हते, पोलिसांना शनिवारी पहाटे कळले की, गेट क्रमांक ७ ओपीडी जवळ एक अपघात झाला आहे, त्यावेळी पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडे तेथील सीसीटीव्ही फुटेज मागितले, मात्र रुग्णालय प्रशासनाने फुटेज देण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाला कायद्याचा बडगा दाखवला तेव्हा पोलिसांना या अपघाताचे फुटेज देण्यात आले.

पोलीस सूत्राच्या म्हणण्यानुसार बळीत महिलेचा रात्री १२:३० वाजता मृत्यू झाला, परंतु रुग्णालयाने महिलेचा मृत्यूची माहिती पोलिसांना शनिवारी दुपारी ३ वाजता दिली,तो पर्यत रुग्णालया कडून लपवालपवी करण्यात येत होती. ही लपवालपवी तसेच पोलिसांना खोटी माहिती देणे नेमकी कुणाला वाचविण्यासाठी होती, हा तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. डॉ. डेरे यांना रविवारी या गुन्ह्यात जामीन मिळाला असला तरी डॉ. डेरे आणि या घटने संदर्भात मनपा प्रशासनाकडून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे कळते.

Exit mobile version