25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषचौदावा केशवसृष्टी पुरस्कार डॉ. बालाजी आसेगावकर यांना प्रदान

चौदावा केशवसृष्टी पुरस्कार डॉ. बालाजी आसेगावकर यांना प्रदान

रश्मी भातखळकर, डॉक्टर अलका मांडके, श्रीमती हेमा भाटवडेकर, डॉक्टर कविता रेगे, श्रीमती रश्मी भातखळकर, श्रीमती अमेया जाधव, ऍडवोकेट सुनीता तिवारी, श्रीमती अर्चना वाडे, श्रीमती सुनयना नटे, वैजयंती आपटे आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी केली निवड

Google News Follow

Related

चौदावा केशव सृष्टी पुरस्कार २४ डिसेंबर २०२३ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशव सृष्टी, उत्तन येथे पार पडला. डॉ. बालाजी आसेगावकर यांना हा पुरस्कार डॉक्टर अनंत पंढरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, इंडियन रेड क्रॉस सोसायटी तथा वैद्यकीय संचालक, डॉ. हेडगेवार रुग्णालय, संभाजीनगर आणि श्री सुरेंद्र गुप्ता, अध्यक्ष, केशव सृष्टी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

 

केशव सृष्टी संबंधित प्रस्तावना डॉक्टर अलका मांडके यांनी तसेच पुरस्कार प्रक्रियेची माहिती श्रीमती हेमा भाटवडेकर यांनी दिली. त्याआधी उपस्थितांकरता केशव सृष्टी संबंधीची माहिती तसेच आजवरच्या तेरा वर्षांच्या पुरस्कार मानकरी यांचा परिचय चित्रफितीद्वारे दिल्या गेला. चौदाव्या पुरस्काराचे मानकरी डॉक्टर बालाजी आसेगावकर यांच्या कार्याची चित्रफित देखील दाखवण्यात आली. डॉक्टर बालाजी यांना केशव सृष्टीद्वारे एक लाख रुपयाचा धनादेश, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ व वनौषधी किट असे देऊन सन्मानित करण्यात आले.

 

डॉ. बालाजी आसेगावकर यांची निवड पुरस्कार समितीच्या सदस्या डॉक्टर अलका मांडके, श्रीमती हेमा भाटवडेकर, डॉक्टर कविता रेगे, श्रीमती रश्मी भातखळकर, श्रीमती अमेया जाधव, ऍडवोकेट सुनीता तिवारी, श्रीमती अर्चना वाडे, श्रीमती सुनयना नटे, वैजयंती आपटे आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी केली होती.

 

पुरस्काराला उत्तर देताना डॉ.आसेगावकर म्हणाले, पुष्कळदा वयस्कर व्यक्तींचे आजार हे मानसिक सुद्धा असतात. शारीरिक व मानसिक व्याधींनी ग्रस्त रुग्णांना प्रेम मिळाले तर त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य सुखावह होते. आपण त्यांच्या आयुष्यातले दिवस जरी वाढवू नाही शकलो तरी त्या दिवसांना आनंदित करू शकलो तरीही एक मोठे कार्य आपल्याकडून घडते असे आवर्जून त्यांनी सांगितले. या पुरस्काराने त्यांच्या कार्याच्या पंखांना बळ मिळाले आहे असे त्यांनी नमूद केले.

 

डॉक्टर अनंत पंढरे यांनी बालाजींच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ईश्वर आपल्या मध्ये कुठलेतरी बीज घालून पाठवतो ते बीज कसं आहे हे आपण शोधून त्याचा वृक्ष बनवायचा असतो. त्यामुळे कुठलेही चांगले विचार कृतीत आणत राहणे म्हणजे सृजनात्मक काम करून कोणाचे तरी भले करणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय असले पाहिजे. मानसिक आधाराने रुग्णांना नक्की बरं करता येते कारण वृद्धत्वाकडे झुकलेली माणसे, भय सापळ्यात अडकूनच़ त्यांची कृतिशीलता कमी होते. त्या मधून त्यांना बाहेर काढणे हे आपले महत्त्वाचे काम असते. एखाद्या गोष्टीचा मोह पडून जसा मोहसापळा निर्माण होतो तसाच हा भयसापळा मनुष्याला कृती शून्य बनू शकतो. आपण जर त्यांच्या मनामध्ये एखाद्या जीवनहेतु घालू शकलो तर त्यांच्या प्रकृतीत नक्कीच सुधारणा दिसू शकते.

 

हे ही वाचा:

राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण नाकारणाऱ्या येचुरींना विहिंपचा सल्ला

फ्रॉड लोन ऍपच्या जाहिराती दाखवाल तर खबरदार!

बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद

आता विनेश फोगाटनेही खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

 

त्यांनी काही जनावरांच्या डॉक्टरांची माहिती देताना सांगितलं, निवृत्तीनंतर त्यांनी अगदी साध्या सोप्या गोष्टी मधून जनावरांचे मृत्यू फरा आजाराने होऊ नयेत याकरीता प्रयत्न केले आणि ते त्यांचे जीवन कार्य बनून गेले अशी सोपी उदाहरणे देऊन डॉक्टर पंढरे यांनी त्यांचे मनोगत सहजपणे उपस्थितांपर्यंत पोहचवले. याचवेळी डॉक्टर बालाजी सारखं काम करणाऱ्या नीना जोशी, किशोर देशपांडे आणि राजन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. केशवसृष्टीतर्फे दरवर्षी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार दिला जातो. श्री गोविंद जालुका यांच्या समर्पित कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार डॉ. अनंत पंढरे यांच्या हस्ते केला गेला. सुरेंद्र गुप्ता यांनी अध्यक्षीय संबोधन आणि आभार प्रदर्शन केले. त्यांनी सांगितले की सेवा करण्याकरीता आपल्या मनात भावना निर्माण व्हायला हवी आणि ती भावना कुणाच्याही मनात येऊ शकते तसंच त्याकरता काही फार पैशाचं पाठबळ लागत नाही. त्यामुळे एक चांगला विचार करून आपण समाजाप्रती आपलं देणं नक्की देऊ शकतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा