पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे.या प्रकरणी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.आरोपी वेंदात अग्रवालच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर याना अटक करण्यात आली होती.अटक करण्यात आलेले डॉ. अजय तावरे यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.याप्रकरणात ‘मी शांत बसणार नसून सर्वांची नावे घेणार’ असल्याचे डॉक्टरने पोलिसांना सांगितले आहे.त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेंदात अग्रवालच्या ब्लड सॅम्पलशी फेरफार केल्याची नुकतीच माहिती समोर आली होती.यानंतर ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना पोलिसांनी अटक केली.या दोघांची पुणे पोलीस चौकशी करत आहेत.
हे ही वाचा:
डॉ. डेरेंनी गाडी चालविली, तेव्हा महिला सायन रुग्णालयासमोर रस्त्यावर झोपली होती!
अग्निवीरांना आता मिळणार करसवलतीचा लाभ
प्रज्वल रेवन्ना भारतात येतोय… ३१ मे ला चौकशीसाठी हजर राहणार
पंजाबी मार्केटचे नाव परस्पर बदलून इस्लामिक मार्केट ठेवले!
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीत डॉ. अजय तावरे यांनी पोलिसांना सांगितले की, ‘मला ज्या पद्धतीने अटक केली.माझे नाव ज्यापद्धतीने तुम्हाला सांगितले.त्यापद्धतीने मला कुणाचे फोन आले होते यांची नावे मी घेणार आहे.मी शांत बसणार नाही,सर्वांची नावे घेणार’, असे डॉक्टरने पोलिसांना सांगितले आहे.त्यामुळे डॉ. अजय तावरे यांच्यावर दबाव कोणाचा होता.यामध्ये त्यांनी किती पैसे घेतले याचीही माहिती समोर येणार आहे.
दरम्यान, डॉ. अजय तावरे यांच्या वक्तव्याने पुणे पोलिसांसह सर्वांच्या भुवया वर उंचावल्या असून या प्रकरणात आता कोणाचे नाव समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणी पोलिसही अधिक तपास करत आहेत.