मोदी यांच्या ११ दिवसांच्या उपवासामुळे काँग्रेसच्या पोटात मुरडा!

उपस्थित केली होती शंका

मोदी यांच्या ११ दिवसांच्या उपवासामुळे काँग्रेसच्या पोटात मुरडा!

राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ११ दिवसांच्या उपवासावरून काँग्रेसला पोटदुखी झाली आहे. ‘कोणताही माणूस ११ दिवस उपवास करून जिवंत राहू शकत नाही. जर मोदी यांनी खरोखरच उपवास केला असेल, तर तो नक्कीच चमत्कार असेल,’ अशी खवचट प्रतिक्रिया काँग्रेसनेते वीरप्पा मोईली यांनी सोमवारी दिली आहे.

‘मी एका डॉक्टरसोबत सकाळी चालत होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, कोणताही माणूस ११ दिवस उपाशी राहून जिवंत राहू शकत नाही. जर ते (पंतप्रधान मोदी) जिवंत आहेत, याचा अर्थ हा चमत्कार आहे? त्यांनी खरोखरच उपवास केला असेल, याबाबत मला शंका आहे,’ अशी प्रतिक्रिया मोईली यांनी दिली.‘जर त्यांनी उपवास न करता राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला असेल, तर ती जागा अशुद्ध झाली असेल. त्यामुळे त्या जागेतून ऊर्जानिर्मिती होणार नाही,” असाही शोध मोईली यांनी लावला.

हे ही वाचा:

DGCA ने एअर इंडियाला ठोठावला १.१० कोटींचा दंड!

ममता दीदीनंतर पंजाबचा सूर बदलला, पंजाबमधून आप- १३ जागांवर एकटाच लढणार!

सूर्या ठरला ‘टी- २० प्लेअर ऑफ दि इअर’

राहुल गांधींना सुरक्षा द्या, खर्गेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र!

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी त्या दिवसापासून ११ दिवस आधीपासून उपवास धरला होता. पंतप्रधान मोदी यांनी चरणामृत पिऊन हा उपवास सोडला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार गोविंददेव गिरी महाराज यांनी त्यांना हे चरणामृत दिले होते.मोईली यांच्या या प्रतिक्रियेवर कर्नाटकचे भाजपचे खासदार लाहारसिंग सिरोया यांनी टीका केली आहे. ‘स्वतः महान लेखक असल्याचा मुखवटा धारण करून येथे तेथे फिरणारे वीरप्पा मोईली यांना सगळेच त्यांच्यासारखे खोटे आहेत, असे वाटते.

मोईली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर ठेवलेल्या उपवासाबद्दल शंका उपस्थित केली आहे. मात्र अवघ्या राष्ट्राला सत्य काय आहे हे माहीत आहे,’ असे ते म्हणाले. ‘जर तुमचा प्रभू श्रीरामावर विश्वास असेल तर तुम्ही उपवास ठेवू शकता आणि जिवंतही राहू शकता. गांधी कुटुंबाची स्तुती केल्याने असे होणार नाही. गांधी कुटुंबीयांची स्तुती करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी, मोईली यांना चिक्काबल्लापूर यांना काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही,’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Exit mobile version