27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरविशेषअंबरनाथमध्ये बांधा-खोदा-बांधा-पुन्हा खोदा धोरणावर कोट्यवधी खर्च

अंबरनाथमध्ये बांधा-खोदा-बांधा-पुन्हा खोदा धोरणावर कोट्यवधी खर्च

Google News Follow

Related

अंबरनाथमध्ये रस्ते बनवायचे आणि पुन्हा ते खोदायचे असे सुरू आहे. यामुळे करोडोंचा चुराडा होत असल्याचे मात्र कुणाच्याच गावी नाही. उल्हासनगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एका मोठ्या जलवाहिनीवरून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे बांधकाम सुरू होते. या महामार्गात अंबरनाथ-उल्हासनगर दरम्यान उल्हासनगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एका मोठ्या जलवाहिनीवरून सिमेंट काँक्रीटीकरण केले. त्यावेळी मात्र हे काम करताना जलवाहिनीवरून काम केल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. आता मात्र हा रस्ता पुन्हा खोदावा लागत आहे.

ही जलवाहिनी उल्हासनगर ३ येथील आनंदनगर परिसरात असणार्‍या जलकुंभला जोडली गेली आहे. शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उल्हासनगर मनपाने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून एमआयडीसीद्वारे ८ एमएलडी वाढीव पाणीपुरवठा मंजूर केलेला आहे.

ही जलवाहिनी स्थलांतरीत न करता त्यावरुन सिमेंट काँक्रीटीकरण केले गेले होते. काम करतानाच ही जलवाहिनी फुटली तर असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी केलेल्या दुर्लक्षाचा भूर्दंड आता सामान्य नागरिकाना सोसावा लागत आहे.

हे ही वाचा:

६५ तासांमध्ये मोदींनी उरकल्या २० बैठका!

इलेक्ट्रिक वाहनांचे आवाहन; पण खर्च पेट्रोल-डिझेलवरच

‘त्या’ अत्याचाराच्या व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती!

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

सध्याच्या घडीला ही जलवाहिनी खराब झाल्यानं तिच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडण्याची वेळ आलीये. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या समोर हा रस्ता खोदण्यात आला असून त्यानंतरच जलवाहिनीची दुरुस्ती करणं शक्य झालंय. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याचा जो पॅच आत्ता खोदण्यात आलाय, तो अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र त्या रस्त्याखालच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह बिघडल्यानं तो दुरुस्त करण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला. त्यामुळं एमएमआरडीएनं केलेला अवघा खर्च पाण्यात गेलाय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा