मुंबईची विशेष ओळख बनलेल्या लाल रंगाच्या डबल डेकर बसचे आता पुन्हा नव्या रुपात आगमन होणार आहे. नव्या आकर्षक डिझाईनसह ही वातानुकुलित आणि प्रदुषणविरहित इलेक्ट्रिक बस पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबईसाठी ९०० इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस बारा वर्षासाठी भाडेतत्वावर खरेदी करायला बेस्टने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण तीन हजार ६०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या राज्य सरकारने यासाठी ९९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्र स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत हा निधी देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ४८ डबल डेकर बसेस सेवेत आहेत.
याबाबत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘बेस्ट डबल डेकर बस आता इलेक्ट्रिक असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी वैयक्तिकरित्या मुंबईच्या प्रतिष्ठित डबल डेकर बसेसचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक आहोत.’
The BEST double-decker, now electric!
CM Uddhav Thackeray and I have been personally keen on reviving Mumbai’s iconic double-decker buses. pic.twitter.com/lQkjvKlVgh
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022
बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले, ‘ या वर्षी २२५ डबलडेकर बसेसची पहिली तुकडी येण्याची अपेक्षा आहे. तर दुसरी तुकडी २२५ बसेससह पुढील वर्षी मार्चपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय उर्वरित ४५० बसेस जून २०२३ पर्यंत रस्त्यावर धावताना दिसतील.’
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय
पाकिस्तानमध्ये आणखीन एका मंदिराची तोडफोड
महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
काय आहेत या नव्या बसची वैशिष्ट्ये?
लाल रंग हा मूळचा असणारच आहे. त्याशिवाय आकर्षक डिझाईन, पूर्णपणे इलेक्ट्रिक बस, बंद-चालू होणारे स्वयंचलित दरवाजे, आवाज-हवा प्रदुषणविरहित, आरामदायी सीट्स तसेच संपूर्ण वातानुकुलीत व्यवस्था अशी या नव्या डबल डेकर बसची वैशिष्ट्ये आहेत.