आली आली दिवाळी आली…दिवाळी निमित्त मुंबईत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने दिवाळी पहाट, भक्तिमय-संगीतमय गाण्यांच्या मैफिली रंगत असतात. अशातच बेस्ट बसनेही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांच्या आवडत्या प्रेक्षणीय स्थळांना, बेस्टच्या खुल्या दुमजली बसने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दर्शन घडवले जाणार आहे.
बेस्ट कडून ही संकल्पना प्रत्यक्षात २२ ऑक्टोबर पासून सकाळी ७ वाजल्यापासून ही सेवा चालू करण्यात आली. तर दर एक-एक तासांनी बस सोडण्यात येणार आहेत. तसेच या उपक्रमाला बेस्ट कडून हेरिटेज पर्यटन सेवा असे नाव देण्यात आले आहे. ही विशेष सेवा दिवाळी संपेपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच ही सेवा ३ नोव्हेंबर २०२१ पासून चालू करण्यात आली असून मुंबईतील हेरिटेज वास्तूंचा नजराणा पाहण्यासाठी दररोज सायंकाळी प्रेक्षणीय स्थळे आणि प्राचीन वास्तूंचे दर्शन घडविणारी पर्यटन बससेवा सुरू केली असून, या सेवेला मुंबईकरांसह पर्यटकांची गर्दी असते.
बेस्टच्या खुल्या दुमजली बसने गेट ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एनसीपीए, मरीन ड्राईव्ह, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, एशियाटिक लायब्ररी, होर्निमन सर्कल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि जुने कस्टम हाऊस आदी स्थळे पाहता येणार आहेत.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
तसेच दुमजली बेस्ट बसचे तिकीट व अन्य माहितीसाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक येथे संपर्क साधण्याचे आवाहन बेस्ट तर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी १८००२२७५५० आणि ०२२-२४१९०११७ हे टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.