सिंधुदुर्ग विमानतळापासून घरी जायला मोजावे लागणार तिकिटाएवढेच पैसे?

सिंधुदुर्ग विमानतळापासून घरी जायला मोजावे लागणार तिकिटाएवढेच पैसे?

कोकणवासियांसाठी आता विमानसेवा उपलब्ध झालेली आहे. येत्या ९ ऑक्टोबरला आता थेट विमानाने सुखद प्रवास करता येणार आहे. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानतळाचा उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे हे विमानतळ ९ ऑक्टोबरपासूनच कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई– सिंधुदुर्ग विमान असा हा प्रवास फक्त २५०० रूपयांत करता येणार आहे. पण विमानातून उतरून नंतर पुढे जायला किती खर्च येणार याचे मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. विमानतळावर उतरून पुढे आपापल्या गावी जाण्यासाठी तिकिटाइतकीच रक्कम मोजावी लागणार की काय असा प्रश्न कोकणवासियांना पडलेला आहे.

सध्याच्या घडीला या विमानातील आरक्षण फुल्ल झालेले आहे. त्यामुळे भविष्यात ही कोकणातील विमानसेवा प्रवाशांसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. हे विमान १ तास २५ मिनिटांत मुंबईहून सिंधुदुर्गला पोहोचेल. एअर इंडियाची (Alliance Air flying) ‘अलायन्स एअर’ ही कंपनी ९ ऑक्टोबरपासून मुंबई – सिंधुदुर्ग मार्गावर नियमित विमानफेरी सुरू करणार आहे. यासाठी एअर अलायन्सने मुंबई-चिपी आणि चिपी-मुंबई हा अनुक्रमे ७४ आणि ७५ वा मार्ग खुला करणार असल्याचे सांगितले आहे. या मार्गावर दररोज थेट हवाई सेवा सुरू होईल.

हे ही वाचा:

भारत बंद म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार

‘भारताला आणखी चार-पाच स्टेट बँक हव्यात’

वाझे म्हणतो, मला घरीच नजरकैदेत ठेवा!

आता आरटीओत न जाताच या संस्थांकडून मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स

 

मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रस्तेमार्गे हा प्रवास करायचा झाल्यास ९ ते १० तासांचा कालावधी लागतो. मात्र या नव्या विमान सेवेमुळे कोकणवासियांना हे अंतर अवघ्या १ तास २५ मिनिटांत गाठता येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव, होळी अशा सणांसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. देशातील हवाई उड्डाणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रादेशिक जोडणी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशाच्या छोट्या विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. कोकणवासियांसाठी हा विमानप्रवास नक्कीच एक आगळा वेगळा अनुभव असणार यात शंका नाही.

Exit mobile version