27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषपुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

Google News Follow

Related

तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा पुणे शहरातील रस्त्यावर डबल डेकर बस धावणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४० मार्गांवर टप्प्याटप्प्याने अशा २० इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्याचा विचार करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी शहरात डबल डेकर बस सुरू कण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आग्रही आहेत. शहरातील झाडांची उंची लक्षात घेऊन डबल डेकर बस सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्मार्ट सिटी प्रशासनाला केल्या आहेत.

पीएमपीएमएलची स्थापना झालेली नसतांना १९८४मध्ये पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत पीएमटी ने शहरातील रस्त्यावर डबल-डेकर बसेस सुरू केल्या होत्या. यापूर्वी दोन्ही महानगरपालिकांचे स्वतःचे परिवहन मंडळ होते. २००७मध्ये ते पीएमपीएलमध्ये विलीन करण्यात आले.जास्त देखभाल खर्च आणि अपघातांमुळे डबल डेकर सेवा १९९५ मध्ये बंद होण्यापूर्वी त्यावेळी सुमारे सहा बस शहराच्या रस्त्यावर धावत होत्या. डबल डेकरसाठी अंतिम ४० मार्गांची निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीएमपीएमएलचे अधिकारी मुंबईतील बेस्टच्या परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मुंबईत बेस्ट परिवहनच्या डबल डेकर बसेस आधीच धावत आहेत. ४० अंतिम मार्गांमध्ये हडपसर-पीएमसी, हडपसर-कात्रज, पीएमसी-बाणेर, भोसरी-आळंदी, भोसरी-निगडी आणि कात्रा-हिंजवडी मार्गे देहू रोड बायपासचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाची पुढील बैठक लवकरच होणार असून, त्यात सविस्तर चर्चा होणार आहे. हडपसर, कात्रज, कर्वे रस्ता परिसरातील प्रवाशांना पाच ते सहा महिन्यांत डबलडेकर बस प्रवासाचा आनंद घेता येण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा