दूरदर्शन लवकरच होणार भारताचे ‘बीबीसी’

दूरदर्शन लवकरच होणार भारताचे ‘बीबीसी’

राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपस्थितीसाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढली आहे. त्यामुळे भारताला लवकरच भारतीय बीबीसी मिळण्याची शक्यता आहे.

गेले काही महिने आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोविड आणि इतर मुद्यांवरून सातत्याने भारताची प्रतिमा मलिन करण्याचे नियोजित प्रयत्न केले गेले आहेत. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला स्वतःच्या बीबीसीची गरज समोर आली आहे.

डीडी इंटरनॅशनलच्या निर्मितीसाठी योग्य त्या सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी जागतिक इओआय १३ मे रोजी काढण्यात आला होता. या सल्लागाराने या वाहिनीच्या निर्मितीसाठी प्रकल्प अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची बाजू समर्थपणे मांडणे, आणि ती आंतरराष्ट्रीय श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हे याचे उद्दिष्ट आहे. डीडी इंटरनॅशनलला बीबीसीच्या धर्तीवर भारतीय बातम्यांसाठी अधिकृत स्रोत म्हणून मान्यता मिळवून देणे हे प्रसार भारतीने उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक स्तरावरील एक उत्तम बातमी वाहिनी निर्माण करणे हे देखील उद्दिष्ट यामध्ये ठरवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसकडून मोदी सरकारची नव्हे, देशाची बदनामी

समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ

ठाकरे सरकार आत्मविश्वासी नव्हे, आत्मघातकी

ही घटना यापूर्वीच व्हायला हवी होती. दूरदर्शनला आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपस्थितीसाठी यापूर्वीच प्रयत्न करायला हवे होते. यापुढे बीबीसी वर्ल्ड सर्विस प्रमाणे दूरदर्शन बातम्यांवर अधिक लक्ष देणारे असेल, आणि पुढे त्यात भारतीय संस्कृतीमधील अनेक देशातील नागरिकांचा रस लक्षात घेता बदल होऊ शकतो. असे द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेंपती यांनी सांगितले.

Exit mobile version