लस येता घरा, तोचि दिवाळी दसरा; घरोघरी लसीकरणाचा मोदींचा निर्णय

लस येता घरा, तोचि दिवाळी दसरा; घरोघरी लसीकरणाचा मोदींचा निर्णय

कोरोना लस घेण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रावर जावे लागत होते. मात्र आता घरच्या घरी कोरोना लस घेता येणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत घरोघरी लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. डोअर टू डोअर लसीकरणाला परवानगी मिळाल्यामुळे बऱ्याच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

मोदी सरकारने मोठा निर्णय घेत घरोघरी लसीकरणाला परवानगी दिली आहे. यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. यामुळे दिव्यांग, वयस्कर आणि आजारी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी (२३ सप्टेंबर) ही माहिती दिली.

हे ही वाचा:

‘ऑकस’नंतर बायडन-मॅक्रॉन “मैत्रीपूर्ण” फोन

क्वाड लवकरच भारतात बनवणार एक अब्ज लसी

मोदींच्या अमेरिका भेटीतून मिळणार सशस्त्र ड्रोन?

‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार

जे लोक केंद्रात जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी घरी जाऊन लसीकरण सुरू करत आहोत. यासाठी सल्लागार जारी करण्यात आला आहे, अशी माहिती पॉल यांनी दिली. आदेशात असे म्हटले आहे की जे लोक लसीकरण केंद्रात जाण्यास असमर्थ आहेत त्यांना लसीकरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी यासाठी विशेष व्यवस्था केली पाहिजे.

देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. लसीकरणाची संख्या देखील ८३ कोटी पार केली आहे. ६६ टक्के नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे, तर २३ टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. सध्या देशात तीन लाख ऍक्टिव्ह केसेस आहेत. यापैकी एक लाखांहून अधिक केरळमध्ये आणि ४० हजारांहून अधिक महाराष्ट्रात आहेत.

 

Exit mobile version