लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब होतोय?……चिंता नसावी!!

लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब होतोय?……चिंता नसावी!!

भारतात कोविडचा प्रभाव वाढत आहे. त्याबरोबरच भारत सरकारकडून लसीकरण देखील वेगाने केले जावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र तरीही विविध कारणांमुळे लसीकरण केंद्रे बंद आहेत हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर लोकांमध्ये अस्वस्थता, भीती आहे. पण ही भीती बाळगण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय लसीकरण मोहिमेची मदार सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींवर आहे. त्याबरोबरच भारतात मॉडर्ना आणि फायझर या दोन लसी देखील भारतात लवकरच दाखल होणार आहेत. लसींचा पुरवठा एका ठराविक मर्यादेत होत असल्याने लसींचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे दुसरा डोस वेळेत मिळाला नाही, तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

हे ही वाचा:

तामिळनाडूत स्टालिन राज सुरु

शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर

स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली काम करणार ‘गांधी-नेहरू’

आता रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार

दुसरा डोस ठराविक वेळेत घेतला पाहिजे हे जरी सत्य असलं तरीही, काही तज्ज्ञांच्या मते, हा वेळ थोडा मागे-पुढे झाला तरी चालतो. त्याने विशेष फरक पडत नसल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या डोस साठी भारतात ८ आठवड्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. परंतु त्यापेक्षा थोडा अधिक वेळ लागला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे गगनदीप कांग (साथरोग तज्ज्ञ) यांनी सांगितले आहे. परंतु त्याच बरोबर दुसरा डोस घ्यायला अधिक उशिरही करू नये असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

फायझर आणि मॉडर्ना या दोन औषध कंपन्यांनी देखील त्यांच्या चाचण्या घेताना, अनुक्रमे २१ आणि २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला होता. त्या आधारे सादर केलेल्या संशोधनानंतर अमेरिकेच्या एफडीएने त्याच दिवसांच्या अंतराने या दोन लसींच्या डोसना परवानगी दिली. एफडीएनेदेखील दुसऱ्या डोसमध्ये थोडा विलंब झाल्यास फार नुकसान होत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर २१ जानेवारी रोजी अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन कडून सांगण्यात आले की दुसरा डोस नियोजित दिवसाच्या जास्तीत जास्त चार दिवस आधी किंवा ४२ दिवस नंतर घेतल्यास  लसीच्या उपयुक्ततेत घट होत नाही.

या सर्व बाबतीत महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे दोन्ही डोस हे एकाच लसीचे असले पाहिजेत.

Exit mobile version