सोसायटीच्या आवारात लुंगी आणि गाउन घालून फिरू नका!

नोएडातल्या रहिवाशांनी केला अजब नियम

सोसायटीच्या आवारात लुंगी आणि गाउन घालून फिरू नका!

ग्रेटर नोएडा येथील एका रहिवासी सोसायटीच्या मालकांच्या संघटनेने सोसायटीतील सामायिक भागांमध्ये स्त्री पुरुषांनी अनुक्रमे नायटी आणि लुंगी घालून फिरण्यास मज्जाव केला आहे. तशा आशयाचे ड्रेस कोड लागू करणारे सूचना वजा आदेश सोसायटीने काढले आहेत.

ग्रेटर नोएडाच्या हिमसागर अपार्टमेंटमधील रहिवाशांना, गृहसंकुलाच्या सामायिक मोकळ्या भागात लुंगी आणि नाईटी घालून फिरण्यापासून प्रतिबंधित करण्यात आला आहे. १० जून रोजी या संदर्भात ड्रेस कोड जारी करून, असोसिएशनने रहिवाशांना तसे स्पष्टपणे सूचित केले आहे.

जरी केलेल्या परिपत्रकानुसार, “कृपया तुमच्या वागणुकीकडे आणि दिसण्याकडे लक्ष द्या जेणेकरून याचा इतर कुणालाही त्रास होणार नाही. तुमच्या मुली आणि मुलगेही तुमच्याकडून शिकतात आणि अनुकरण करतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, घरातील पोशाख असलेल्या लुंगी आणि नाईटी घालून सोसायटीमध्ये फिरू नये.” असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम

सुसज्ज गुजरात करणार बिपरजॉयचा सामना

वसईत धर्मांतरप्रकरणी मुंब्र्यातून एकाला अटक

जीवरक्षकाला हुलकावणी देत जुहूकिनारी गेलेल्या ‘त्या’ चारही मुलांचे मृतदेह सापडले

मात्र रहिवाशांनी कपड्यांबाबत त्यांच्या वैयक्तिक आवडी निवडींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या पत्रकाचा विरोध केला असून, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे हनन असल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे. तर असोसिएशनने हे परिपत्रक इतर रहिवाशांच्या तक्रारींवर आधारित असल्याचे कारण दिले आहे. हा नियम कोणावरही लादण्यात आलेला नाही. हे परिपत्रक रहिवाशांना बंधनकारक नसल्याचे सांगत अपार्टमेंट असोसिएशनने सांगितले की, याच गृहसंकुलातील एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Exit mobile version