बदलापूरमध्ये चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं कुणीही वकीलपत्र घेऊ नका, असे आवाहन कल्याणमधील वकील संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, बदलापूरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बदलापूरमध्ये इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बदलापूरमध्ये कलम १६३ लागू करण्यात आला आहे. शहरातील दुकानं देखील बंद आहेत.
दोन लहान चिमुकलींवर अत्याचार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदेला २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या नावावर अनेक गुन्ह्यांच्या नोंदी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईमधून अनेक ठिकाणी निदर्शने करत लोकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर कल्याणमधील वकील संघटनेच्या वतीने मोठे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेतील मुख्य आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन कल्याणमधील वकील संघटनेतर्फे सर्व वकील बांधवाना करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
टिकैत म्हणतात, आम्ही २५ लाख शेतकऱ्यांना संसदेच्या दिशेने घेऊन जायला हवे होते !
४५ वर्षानंतर भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर, नरेंद्र मोदी रवाना !
पाकिस्तानी संसदेत आता ‘बंदोबस्ता’साठी मांजरींची नियुक्ती
हिंदूंच्या संरक्षाणासाठी चारही शंकराचार्य सरसावले !
वकील संघटनेने सांगितले की, निंदनीय अशी ही घटना आहे. या घटनेचा संघटनेकडून काल जाहीर निषेध करण्यात आला. आमच्या संघटनेने असा ठराव केला आहे की, या आरोपीचं कुणीही वकीलपत्र घेऊ नये. आज सकाळी आरोपीला कोर्टात दाखल करण्यात आले. आमच्या संघटनेकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर आरोपीचे कोणीही वकीलपत्र स्वीकारलं नसल्याचे संघटनेने सांगितले. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला २४ तारखे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.