वरळी कार अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांनी दिल्या आहेत.
मुंबईतील वरळीत असलेल्या अॅट्रिया मॉलजवळ आज( ७ जुलै) पहाटे ५.३० च्या सुमारास एका चार चाकी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील कावेर नखवा (४५) या महिलेचा मुत्यू झाला. अपघातावेळी कारमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते असलेल्या राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शाह आणि त्यांचा कार चालक होता. मात्र, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मिहिर शाह अद्याप फरार आहे. पोलिसांनी कार चालक आंणि मिहीर शाह या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
फॉर फ्युचर इंडिया संस्थेचे ३०० वे स्वच्छता अभियान
दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये कुराण, कलमाचे ‘शिक्षण’ देत असल्याची तक्रार
सिगारेट देण्यास नकार; डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण !
मुंबईच्या तलावात वरुणराजा प्रसन्न, पाणीपातळीत ४ टक्क्यांची वाढ
या प्रकरणी अपघातग्रस्त पीडित कुटुंबाची भेट उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलिसांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच वरिष्ठ नेत्यांकडून दबावाला फोन येऊ नये असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सूचना देत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.