लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना इशारा दिला आहे.राजकीय विश्लेषकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका, दिशाभूल होऊ नका आणि येणाऱ्या २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा, असे पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले आहे.राम मंदिराच्या निर्मितीमुळे भाजपसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.परंतु, तरीही जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत न बसण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे.
सध्याचे वातावरण भाजपच्या बाजूने तयार झालेले पाहायला मिळत आहे.देशातील अनेक राज्यात भाजप आघाडीवर आहे.हेच चित्र पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं अव्वल येईल हे दिसून येते.परंतु, अशा दाव्यांपासून लांब राहण्याच्या स्वतः पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या आहेत.राजकीय विश्लेषकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका असा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत.तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.२००४ जी चूक झाली ती करू नका, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.
आता सध्याची जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती २००४च्या निवडणुकीपूर्वी झाली होती.२००४ च्या वेळी सुद्धा भाजपचं जिंकेल अशी आशा व्यक्त केली जात होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ‘इंडिया शायनिंग’ला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.परंतु, शेवटच्या टप्प्यावर असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी दुर्लक्ष केले आणि हलगर्जीपणा दाखविला.याचा परिणाम निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिसून आला.सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला भाजपपेक्षा सात जागा जास्त मिळाल्या. सर्वात मोठा पक्ष ठरुन काँग्रेसने सत्ता स्थापन केली आणि पुढील दहा वर्ष सत्तेत राहिला.काँग्रेसने युपीए आघाडी स्थापन केली आणि मनमोहन सिंग सलग दोन वेळा पंतप्रधान झाले.
हे ही वाचा:
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
लडाखमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले!
मेरठमधून पाकिस्तानी आयएसआय एजंटला एटीएसकडून अटक!
भावनगरमध्ये एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार
सध्या देशात भाजप अव्वल आहेच.तसेच भाजपकडून ‘अबकी बार ४०० पार’चा नारा देण्यात आला आहे. पण, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना जागेच्या संख्येबाबत गाफील राहायचे नाही.त्यामुळे भाजप अव्वल राहण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणजे, बिहारमधील नितीश कुमारांच्या जेडीयूसोबत सत्ता स्थापन करणे.तसेच ओडिशामध्ये देखील भाजप सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास यशस्वी झाला आहे.
पंतप्रधान मोदींची जागतिक पातळीवर लोकप्रियता अधिक आहे.तसेच अर्थव्यवस्थेबाबत जागतिक देशांपेक्षा भारताची स्थिती चांगली आहे.केलेल्या कामांना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम भाजप याशिस्वीपणे करत असले तरी पुन्हा सत्तेत येणासाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे.त्यामुळे तिसऱ्यांना सत्तेत येण्यासाठी मोदींनी मंत्र्यांना पूर्ण झोकून देऊन काम करण्याचे निर्देश दिले आहेत.आपला प्रत्येक भाजप समर्थक मतदान करेल याकडेही लक्ष देण्यास पंतप्रधान मोदींनी नेत्यांना सांगितले आहे.