आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

Image Credit IMD

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ताऊक्ताई या वादळाची निर्मिती झाली आहे. वादळ लवकरच किनारपट्टीच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यापूर्वी निसर्ग वादळाने कोकणात धडक दिल्यानंतर महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारचे व्यवस्थापन आणि मदत कार्य कोलमडून पडले होते. त्यामुळे निदान या वादळाच्या वेळी तरी कोकणवासीयांना पुरेशी मदत करण्यात यावी अशा तऱ्हेचे ट्विट भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने चिंता वाहणाऱ्या मोदी सरकारचे अभिनंदन

ठाकरे सरकार खोटं बोलत होतं- विनायक मेटे

ठाकरे सरकारच्या एकूणच नियोजन आणि व्यवस्थापनात मधील पूर्वानुभव लक्षात घेता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी कोकणवासीयांना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका असे सांगणारे ट्विट केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून पुन्हा एकदा अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात,

‘निसर्ग’ वादळाने यापूर्वी ठाकरे सरकारचे व्यवस्थापन आणि मदतकार्य कोलमडून पाडले होते. पुन्हा वादळाने महाराष्ट्रात धडक दिलीय. आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका.

यापूर्वी कोकणात निसर्ग चक्रीवदळाने धडक दिली होती. त्यामध्ये अनेकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर महाविकास घाडीने आपल्या शिरस्त्याप्रमाणे नुकसानभरपाई जाहिर करायला आणि जाहिर केलेलनी नुकसानभरपाई प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचवायला खूप उशिर केला होता. त्यामुळे अनेक कोंकणवासीयांचे हाल झाले होते.

भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये तयार झालेले ताऊक्ताई हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे, मात्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत पावसाची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. सिंधुदुर्गसह मुंबईत देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभर विविध तीव्रतेच्या पावसाच्या सरींचा अंदाज देण्यात आला आहे. येते काही दिवस राज्यात विविध ठिकाणी विविध तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Exit mobile version