रामानंद सागर यांच्या रामायणातील सीतेचे पात्र अमर करणारी दीपिका चिखलिया अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.दीपिकाचे प्रभू रामावर असलेले प्रेम आणि सोहळ्यासाठी केलेल्या तयारीबद्दल खुलासा केला आहे.
२२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस आहे.
२२ जानेवारीबद्दलचा उत्साह व्यक्त करताना दीपिका म्हणते, ‘हा माझ्यासाठी खूप ऐतिहासिक दिवस आहे. येत्या पिढ्यांसाठी याला खूप महत्त्व असेल कारण रामजी ५०० वर्षांनंतर अयोध्येत परतणार आहेत. आपल्या घरी येत आहे.माझी रामजींवर नितांत श्रद्धा आहे. मी माझ्या आयुष्यातही सीतेची भूमिका साकारली आहे. माझ्यासाठी हा खरोखर खूप भावनिक क्षण असणार आहे. उलट हा काळ सर्व भारतीयांसाठी इतका अभिमानास्पद असेल की, आपण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत हे येणाऱ्या पिढयांना आपण सांगू शकतो.
हे ही वाचा:
अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच
रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र
ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार
बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!
तुम्हीही मला सीता मानता का?
आमंत्रण मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणते, ‘मी या आमंत्रणासाठी अजिबात तयार न्हवते. मला त्याची अपेक्षाही नव्हती.जेव्हा मला आरएसएस कार्यालयातून फोन आला आणि ते म्हणाले की, तुम्ही आमच्यासाठी सीताजी आहात, संपूर्ण जग तुम्हाला याच नावाने ओळखते. आपली उपस्थिती खूप महत्वाची आहे. म्हणून, कृपया आमचे आमंत्रण स्वीकारा. हे एकूण मला खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात माझ्या तोंडून निघाले की, आपणही मला सीता मानता का? तेव्हा ते म्हणाले, यात काही शंकाच नाही.
प्रभू रामांना माता सीतेसोबत ठेवा
मात्र, प्रभू रामांसोबत सीताजींची मूर्ती नसल्याचं दीपिकाला दु:ख आहे. तिचं दु:ख व्यक्त करताना दीपिका म्हणते, ‘मला नेहमी वाटायचं की रामजीच्या शेजारी सीताजींचा पुतळा असेल. तथापि, येथे तसे नाही, ज्याची मला खंत आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आमच्या पंतप्रधानांना अयोध्येत रामासह सीताजींचा मूर्ती बसवण्याची विनंती करू इच्छिते. प्रभू राम आणि सीताजी वास करू शकतील अशी एखादी जागा असावी. माझी तुम्हाला विनंती आहे की, रामजींना एकटे ठेवू नका. त्यांचे बालपण अयोध्येत आहे असे मला वाटते. हे एक अतिशय सुंदर रूप आहे, प्रभावी आहे. माता सीतेलाही रामजींसोबत ठेवले तर मलाच नाही तर सर्व महिलांना खूप आनंद होईल.