प्रज्ञानंदच्या पालकांना सुधा मूर्ती यांनी दिला मोलाचा सल्ला !

स्पर्धात्मक किंवा सर्वसाधारण परीक्षेत बसण्यासाठी पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये

प्रज्ञानंदच्या पालकांना सुधा मूर्ती यांनी दिला मोलाचा सल्ला !

बाकु येथे खेळल्या गेलेल्या ‘फिडे बुद्धिबळ विश्वचषकात’ भारताच्या प्रज्ञानंदचे कौतुक झाले. या सामन्याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते.मात्र, चॅम्पियन मॅग्नस कार्लसनकडून प्रज्ञानंदला पराभव स्वीकारावा लागला.वयाच्या १८ व्या वर्षी प्रज्ञानंदने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी संपूर्ण भारताला त्याच्याकडून यशाची अपेक्षा होती. यावेळी सुधा मूर्ती यांनी पालकांना ‘तुमच्या पाल्याचा ताण वाढवू नका’ असा सल्ला दिला.

बाकु (अझरबैजान) येथे फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन या दोघात अंतिम सामना रंगला.मात्र, या खेळात मॅग्नस कार्लसनने बाजी मारली आणि आर. प्रज्ञानंदला पराभव पत्करावा लागला. बुद्धिबळच्या सामन्यात प्रज्ञानंदचा पराभव झाला असला तरी त्याचे देशभरातून कौतुक होत आहे.प्रज्ञानंदला अपयश मिळाल्याने त्याच्या पालकांनी त्याच्यावर दबाव टाकू नये तर त्याला पुढच्या खेळासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन सुधा मूर्ती यांनी केले व पालकांना सल्ला दिला.

हे ही वाचा:

चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर?

इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’

मध्य प्रदेशात ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळे काँग्रेसमध्ये कलह

मोदी-शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेत एकमेकांना भेटले

काय म्हणाल्या सुधा मूर्ती ?

बुद्धिबळ विश्वचषकात प्रज्ञानंदच्या कामगिरीनंतर सुधा मूर्ती यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या ‘प्रज्ञानंदला जिंकायचे आहे, त्यामुळे त्याच्यावर दबाव आणू नका. प्रज्ञानंदने शांत होऊन त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.खेळासाठी कोणीही खेळाडूवर ताण देऊ नये.त्याला नेहमी शांत मनाने खेळण्याची परवानगी दिली पाहिजे, असे सुधा मूर्ती म्हणाल्या.कोणत्याही स्पर्धात्मक किंवा सर्वसाधारण परीक्षेत बसण्यासाठी पालकांनी मुलांवर कोणताही दबाव टाकू नये. तसेच आनंदी राहा आणि तुमचे यश, अपयश याला धरून राहा, त्या पुढे म्हणाल्या. सुधा मूर्ती म्हणाल्या, प्रज्ञानंदच्या या संपूर्ण प्रवासात त्याची आई आघाडीवर होती.मग त्या आईचा साधेपणा असो किंवा त्यांच्या चेहऱ्यावर त्याच्या मुलाच्या यशाचा आनंद असो. प्रत्येक पालकाने हा साधेपणा अनुभवला पाहिजे कारण तुमचा हा साधेपणा तुमच्या मुलांना यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत राहील.

Exit mobile version