लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे.१३ राज्यांमध्ये लोकसभेच्या ८८ जागांसाठी आज (२६ एप्रिल) मतदान होत आहे. यादरम्यान राज्यसभा खासदार आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी बंगळुरूमधील बीईएस मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘लोकांनी घरात बसून बोलू नये, बाहेर येऊन मतदान करावे’, असे त्या म्हणाल्या आहेत.
सुधा मूर्ती तरुणांना आवाहन करत म्हणाल्या की, ‘मला सर्वांना सांगायचे आहे की, घरी बसू नका, बाहेर येऊन मतदान करा. तो तुमचा अधिकार आहे आणि आपल्या नेत्याची निवड करा. ग्रामीण भागातील लोकांपेक्षा शहरांतील लोक कमी मतदान करतात, असे मला नेहमीच वाटते. माझ्या वयाचे लोकही जास्त मतदान करत आहेत, त्यामुळे मी तरुणांना आवाहन करेन की, तुम्ही या आणि मतदान करा.सुधा मूर्ती या प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.सामाजिक कार्यासाठी सुधा मूर्ती यांना गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हे ही वाचा:
पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक
दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!
बॅलेट पेपर नाही; ईव्हीएमवरच होणार निवडणुका!
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनीही आज बेंगळुरूमध्ये मतदान केले. त्या म्हणाल्या की, ‘अधिकाधिक लोकांनी यावे आणि मतदान करावे, अशी माझी इच्छा आहे. मला असे वाटते की, लोकांना स्थिर सरकार हवे आहे, त्यांना चांगली धोरणे, प्रगती आणि विकास हवा आहे आणि त्यासाठीच ते बाहेर पडत आहेत.पंतप्रधान मोदींचा चालू असलेला कार्यकाळ त्यांना पाहायचा आहे, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
विरोधकांवर आरोप करताना त्या म्हणाल्या की, विरोधकांकडे आता स्वतःचा कोणताच मुद्दा नाही.त्यांच्याकडे कोणताच सकारात्मक अजेंडा नाहीये , त्यामुळेच ते सारखे पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत.त्यांच्याकडून व्यक्तिगत टीका केली जात आहे, आणि सर्वात वाईट म्हणजे ते अशा गोष्टी आणत आहेत ज्याची अंमलबजावणी ते स्वतः करू शकत नाहीत.