दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे गुरु असलेले सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आपल्या शिष्यावरच हल्ला चढवला आहे.अण्णा हजारेंनी मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन केले आहे.देशाच्या सत्तेची चावी चुकीच्या हातात जाऊ नये, असे ते म्हणाले आहेत.ते म्हणाले, आज लोकशाहीचा मोठा उत्सव असून त्यात सर्वांनी सहभागी होऊन चारित्र्यवान आणि प्रामाणिक व्यक्तीला मतदान केले पाहिजे.देशाची चावी मतदारांच्या हाती आहे, त्यामुळे ही चावी योग्य माणसाच्या हाती दिली पाहिजे.अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धीमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
अण्णा हजारे पुढे म्हणाले की, योग्य उमेदवारांना निवडून द्या.अशा लोकांना निवडू नका, ज्यांच्या मागे ईडी लागली आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांचे नाव आल्यानंतर मी त्यांच्यावर टीका करतो.दारूच्या नशेत असल्याने त्यांनी हा भ्रष्टाचार केला.असे लोक पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असे अण्णा हजारे म्हणाले.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमधील पहिल्याच निवडणुकीला मतदारांच्या रांगा!
“पाकिस्तानला बांगड्या घालायला लावतो”
भारताने विमाने दिली, पण मालदीवकडे वैमानिकच नाहीत!
मी पक्ष पाहत नाही स्त्री किंवा पुरुष असेल तरी त्याचे चारित्र्य चांगले पाहिजे. हा देश कोणी चालवायचा त्याची चावी कोणाच्या हातात द्यायची हे ठरवायचे आपल्या हातात आहे. मतदाराच्या हाती चावी आहे. योग्य चावी लावली पाहिजे. चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचे वाटोळे होईल, असे अण्णा हजारे म्हणाले.