पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३ मे) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे नाव न घेता निशाणा साधला.राहुल गांधी यांच्या रायबरेली उमेदवारीवरून टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, शहजादे यांना माहित आहे की ते वायनाडमधूनही हरणार आहेत.ही लोकं सर्वत्र फिरून सर्वांना सांगत आहेत की घाबरू नका.आज मला त्यांना सांगायचे आहे की, ‘डरो मत, भागो मत’. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, शहजादे वायनाडमध्ये हरणार हे मी पहिलाच सांगितले होते.पराभवाच्या भीतीने मतदान संपताच ते दुसरी जागा शोधू लागतील.आधी ते अमेठीतून पळून गेले आणि आता रायबरेली मध्ये मार्ग शोधत आहे.दरम्यान, काँग्रेसने रायबरेली आणि अमेठीमधील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. रायबरेलीतून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत, तर किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले आहे.राहुल केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत, जिथे दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे.
हे ही वाचा:
‘सीबीआय’ भारतीय संघराज्याच्या नियंत्रणाखाली नाही
पाकिस्तानातील सिंधी समाज करणार ‘राम लल्लाचा जयघोष’
पॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!
प्रज्वल रेवण्णा यांची कृष्णाशी तुलना!
सोनिया गांधींवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलची गरज नाही.मी संसदेत पहिलाच सांगितले होते की, यांची मोठी नेता ( सोनिया गांधी) निवडणूक लढवणार नाही आणि त्या पळून जाऊन राजस्थानमधून राज्यसभेवर जातील.वायनाडमध्ये शेहजादेचा पराभव होणार आहे, हे मी पहिलाच सांगितले आहे.पराभवाच्या भीतीमुळे तो मतदान संपताच दुसरी जागा शोधू लागेल.हे लोक फिरतात आणि सर्वांना सांगतात – ‘डरो मत’.मात्र, मी त्यांना हेच सांगेन -‘डरो मत, भागो मत’
टीएमसी आणि काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसी, काँग्रेसचे लोक मोदींना गोळी घाला असे म्हणत असले तरी मी घाबरणारा नाहीये. कार्यकर्ता कधीही घाबरत नाही हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.मी गरिबीतून बाहेर आल्यामुळे माझ्या शब्दकोशात भीती नावाचा शब्द नाही.तुम्ही मला जितक्या शिव्या द्याल, माझा तिरस्कार कराल, तितकी जास्त सेवा मी माझ्या देशवासियांची करेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.