मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात भारताच्या संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवून विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. विराट कोहलीचे शतकांचे अर्धशतक आणि गोलंदाज मोहम्मद शामी याच्या भेदक गोलंदाजीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक मीम्स आणि विनोद शेअर केले जात आहेत. यात दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिसही मागे नाहीत.
दिल्ली पोलिसांनी त्यांच्या ‘एक्स’ या खात्यावरून याची सुरुवात केली. त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग करून लिहिले, ‘मुंबई पोलिस, आज रात्री केलेल्या हल्ल्याप्रकरणी तुम्ही मोहम्मद शामी याला अटक करणार नाही, अशी आशा आहे.’ त्यावर मुंबई पोलिसांनीही लगेच उत्तर दिले आहे. ‘दिल्ली पोलिस, तुम्ही असंख्य हृदये चोरल्याप्रकरणी अन्य गंभीर गुन्हे दाखल करू शकला नहीत. तसेच, आणखी काहींनाही तुम्ही आरोपी करू शकला नाहीत,’ असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. याचा अर्थ या सामन्यात उत्तम कामगिरी करणारे विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल, जसप्रीत बुमराह यांनीही चांगली खेळी केली. याकडे मुंबई पोलिसांनी लक्ष वेधले आहे.
काही वेळानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारतीही यात सहभागी झाले. यात कोणताही गुन्हा होत नाही, असे त्यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट केले. ‘अजिबात नाही, दिल्ली पोलिस. आत्मसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत सुरक्षेसाठी हेच योग्य आहे,’ अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या वाईट कामगिरीनंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार
गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू
शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग
जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शामी याने ५७ धावा देऊन सात विकेट घेतल्या आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.