रामलल्ला राम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच भक्तांचा महापूर दर्शनासाठी लोटला आहे. पहिल्याच दिवशी भाविकांनी रामलल्लाला तीन कोटी १७ लाख रुपये अर्पण केले आहेत.राम मंदिर उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी सुमारे अडीच लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. मंगळवारी योगी आदित्यनाथ यांनी पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या होत्या. त्याचे परिणाम बुधवारी दिसले. प्रशासनाने अथक प्रयत्नांनंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बहुपयोगी तीर्थक्षेत्र सुविधा केंद्र सुरू केले. त्यामुळे सारे काही व्यवस्थित होण्यास मदत मिळाली.
रामलल्लाला दरदिवशी कोट्यवधींचे दान आणि भोग दिले जातात. मात्र पहिल्या दिवशी अनेक अडथळे पार करून दर्शन घेतलेल्या भाविकांनी तरीही तीन कोटी १७ लाख रुपये देवाच्या चरणी अर्पण केल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
राममंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर मंगळवारी नवे मंदिर सर्वसामान्य रामभक्तांसाठी खुले करण्यात आले. त्यावेळी जणू भक्तांचा महासागरच लोटला होता. लाखोंच्या संख्येने भाविक आले असल्याने रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांना कठीण परीक्षेतून जावे लागले.
हे ही वाचा:
विजय पाटिदारची निवड योग्य, मात्र अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळणे कठीण!
उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!
कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!
इंडी आघाडीला मैत्रीपूर्ण “खंजीरा”चा महामंत्र
तरीही भाविकांनी रामचरणी निधी अर्पण करण्याची संधी सोडली नाही. ज्याप्रमाणे त्यांना दर्शनासाठी झगडावे लागले, त्याचप्रमाणे त्यांना दान देण्यासाठीही कसरत करावी लागली. मात्र तरीही ते मागे हटले नाहीत. ‘मंगळवारी आलेले दान अतिशय महत्त्वाचे आहे. ऑनलाइन समर्पण निधी अर्पण करण्यासाठी रामभक्तांना बरेच कष्ट पडले. इतकी गर्दी असूनही क्यू आर कोड स्कॅन करून त्यांनी आपली निष्ठा सादर केली,’ असे राम मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले.