डॉमिनिका देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान!

कोविड काळात केलेल्या योगदानाचा केला उल्लेख

डॉमिनिका देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान!

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कामाचा डंका गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात गुंजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याची दखल घेऊन वेळोवेळी अनेक मोठ्या देशांनी त्यांचा सर्वोच्च सन्मान केला आहे. आता या यादीत डॉमिनिका देशाचाही समावेश झाला आहे. डॉमिनिका देशाने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मानने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल डॉमिनिकाने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या काळात जगभरातील देशांसोबत भारतही या जीवघेण्या विषाणूच्या साथीशी झुंज देत होता. अशा कठीण काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते. तसेच अशा परिस्थितीत इतर देशांना लस आणि औषधे पोहचवण्याचे कामही त्यांनी केले होते. पंतप्रधान मोदींच्या या कामांच्या पार्श्वभूमीवर डॉमिनिका राष्ट्रकुलने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा  :

मालेगाव व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद संबंधी ईडीकडून छापेमारी

ठाकरेंना अदानींचं खाजगी विमान चालतं, एरव्ही अदानी खटकतात!

एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त

बांगलादेशी-रोहिंग्यांचा बाजारात प्रवेश, भाजी विक्रेत्यांना गाड्यांवर नावे लिहावे लागणार!

डोमिनिका हा उत्तर अमेरिका खंडातील कॅरिबियन प्रदेशात स्थित एक देश आहे. कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेल्या कामाची दखल घेत या देशाने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला. ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ असे या सन्मानाचे नाव आहे. या विशेष सन्मानामुळे भारत आणि डॉमिनिका यांच्यातील भागीदारी मजबूत करण्यासाठीचे त्यांचे समर्पण आणखी मजबूत होईल.

Exit mobile version