डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये काल झालेल्या स्फोटामध्ये मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे.अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून अजूनही शोधकार्य सुरूच आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पथकाला आज तीन मृतदेह सापडेल असून मृतांचा आकडा ११ वर जाऊन पोहोचला आहे.यापैकी एक मृतदेह केजी केमिकल्स कंपनीच्या आवारात आढळल्याची माहिती आहे.
एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत गुरुवारी (२३ मे) दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला.कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली.सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचे हादरे बसले.स्फोट इतका भयानक होता की परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या होत्या.
हे ही वाचा:
‘जो काँग्रेसच्या पावलावर चालेल, तो रसातळाला जाईल’
‘अरविंद केजरीवाल हे ‘अनुभवी’ चोर’
‘मुलगा नाही, ड्रायव्हर गाडी चालवत होता’
केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती सेम टू सेम!
अग्निशमन पथकाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.यानंतर शोधकार्य सुरु झाले ते अजूनही सुरूच आहे.उद्ध्वस्त अवशेषांच्या ढिगाऱ्याखाली शोध घेत असताना पथकाला आज तीन मृतदेह मिळाले असून मृतांचा आकडा ११ वर पोहचला आहे.दरम्यान, दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.तसेच डोंबिवलीकरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीतील धोकादायक केमिकल कंपनींना डोंबिवलीच्या हद्दीतून बाहेर स्थालांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे मुख्यामंत्र्यांनी सांगितले.