दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या मालक मालती मेहता यांची सुटका करण्यात आली आहे.मालती मेहता यांना काल (२४ मे) नाशिक मधून अटक करण्यात आली होती.चौकशीमध्ये मालती मेहतांचा कंपनीशी संबंध दिसून न आल्याने त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.
गुरुवारी(२३ मे) दुपारच्या सुमारास अमुदान कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने ११ जणांचा बळी गेला होता तर अनेक जण जखमी झाले होते.एमआयडीसीतील रिअॅक्टर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर मानपाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर कंपनीचे फरार होते.मलय मेहता यांना शुक्रवारी अटक करण्यात अली होती तर मालती मेहता यांना नाशिक मधून काल अटक करण्यात आली होती.मात्र, मालती मेहता यांची चौकशी केली असता कंपनीशी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे पोलिसांनी त्यांना सोडून दिले आहे.
हे ही वाचा:
अजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!
‘हेलिकॉप्टरमधून फिरणारे लवकरच तुरुंगात जातील’
पॅट कमिन्सचा हैदराबादचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत
१३ वर्षांपासून फरार आरोपी नागपुरात साधूच्या वेशात विकत होता जडीबुटी, पोलिसांकडून अटक!
मिळालेल्या माहितीनुसार, मालती मेहतांच्या पतीच्या मृत्यूनंतर कंपनी मुलाच्या म्हणजेच मलय मेहता याच्या नावावर झाली.त्यामुळे गुन्हे शाखेने त्यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.देवदर्शनासाठी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.तपासात काही समोर आल्यानसल्याने त्यांना सोडून देण्यात आले.मात्र, पून्हा गरज लागल्यासं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी मालती मेहता यांना दिले आहेत.तर दुसरीकडे मालती मेहता यांचा मुलगा आणि अमुदान कंपनीचा मालक मलय मेहता याला आज कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची म्हणजेच २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.