23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषलिफ्ट अपघातात बळी गेल्यानंतर विचारले जात आहेत हे प्रश्न?

लिफ्ट अपघातात बळी गेल्यानंतर विचारले जात आहेत हे प्रश्न?

Google News Follow

Related

वरळी येथील बांधकामादरम्यान लिफ्ट कोसळून काहीजणांना जीव गमवावा लागला. तब्बल पाच कामगार या दुर्घटनेमध्ये ठार झाले. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी तसेच इतर निवासी संकुलाच्या लिफ्टचा सुरक्षा मुद्दा हा आता ऐरणीवर आलेला आहे.

आता ज्या निवासी इमारतींना लिफ्ट आहे अशा सर्वांनाच आता भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच निवासी इमारतींमधील लिफ्ट किती सुरक्षित असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लिफ्टचा वापर करताना लिफ्टचे बांधकाम, देखभाल आणि सुरक्षितता याबाबत कायद्यात अनेक प्रकारच्या तरतुदी आहेत, याची अनेकांना माहिती असतेच असे नाही. तसेच यापैकी किती बाबींचे पालन सोसायट्यांकडून केले जाते, हा मुद्दाही या निमित्ताने चर्चेला आला आहे. एकूणच काय तर लिफ्टच्या सुरक्षेचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आहे.

विकासकाने इमारत हस्तांतरित केल्यानंतर लिफ्टच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होतो. लिफ्टच्या व्यवस्थापनासाठी पैसा खर्च होत असल्यामुळे, त्याकरता तरतूद करणे हे सोसायटीचेच काम असते. तसेच अन्यथा देखभाल आणि वीज खर्च परवडणारा नसेल तर चालू लिफ्ट बंद करण्याची वेळ सोसायट्यांवर येते. आजच्या घडीला लिफ्टच्या व्यवस्थापनाचा खर्च परवडत नसल्याने अनेक लिफ्ट बंद पडून आहेत. इमारतींमध्ये फायर लिफ्ट सुद्धा असायला हव्यात असे कायद्यात आहे. प्रसंगी अपघाताचा धोका टाळता येतो. परंतु आपल्याकडे एकूणच विकासकांच्या हातात इमारती दिल्यानंतर ते त्यांना हवे तसे अनेक नियमांची पायमल्ली करतात. त्यानंतर सोसायटीला हे सर्व व्यवस्थापन झेपेनासे होते त्याचमुळे लिफ्ट असूनही अनेकठिकाणी त्या बंद पडलेल्या दिसतात.

हे ही वाचा:
अबब! तिने ६६ फुटांवरून केला अचूक थ्रो

न्यूज डंका, कारुळकर प्रतिष्ठानची पूरग्रस्तांना साथ; आपलाही हवा मदतीचा हात

भास्कर जाधव थोडी लाज बाळगा…

मुख्यमंत्र्यांची पुन्हा माघार

आठपेक्षा जास्त मजले असलेल्या इमारतींना दोन लिफ्ट असायला हव्यात. त्यातील एका लिफ्टला ‘फायर लिफ्ट’ म्हटले जाते. दैनंदिन वापरात तिचा नागरिकांना उपयोग करता येतो. तसेच हायराइज टॉवरना म्हणजेच ७० मीटरपेक्षा उंची इमारतींना रहिवासी लिफ्टसोबत सामान वाहून नेणारी स्वतंत्र लिफ्ट बसवणेही बंधनकारक आहे.

सेच लिफ्ट उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नियमांनुसार लिफ्ट वर-खाली करताना मार्गिकेत हवा खेळती राहून व्हेंटिलेशन (वायुविजन) ठेवणे महत्त्वाचे ठरते. तसेच लिफ्टचे दरवाजे कसे असावेत, लिफ्टची गती किती असावी, एका लिफ्टमध्ये किती वजन असावे, दिवसातून लिफ्ट किती वेळ सुरू ठेवावी, याचे प्रत्येकाने आपल्या वापरानुसार सोसायट्यांनी नियम ठरवून घेतल्यास लिफ्टचे आयुर्मान वाढीस लागू शकते, असे मुंबई लिफ्टच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा