राज्यातच नव्हे तर देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अशातच आता डॉक्टरांनी एक दिवसाचं काम बंद आंदोलन पुकारलं आहे. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी हे आंदोलन पुकारले आहे. तसेच शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मात्र 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
शायकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा आणि त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, या मागण्या डॉक्टरांतर्फे करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर्स आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहेत, आंदोलन केले जात आहे. परंतु, शासनानं वेळोवेळी आश्वासने देऊन त्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले गेले. यावेळी मात्र मागण्या मान्य झाल्या नाही तर 22 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर
कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या
मुंबई महानगरपालिकेकडून पंचतारांकित हॉटेलच्या वापराला सुरूवात
देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना संकटात एकाही दिवसाची सुट्टी न घेता, तसेच क्वॉरंटाईन लीव्ह न घेता हे सर्वजण २४ तास काम करत होते. परंतु या सर्व डॉक्टरांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झालेलं आहे. जर डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या तर शासनावर आर्थिक भार येईल, असं चित्र रंगवण्यात येत आहे. परंतु, असं काहीही होणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा असा इशारा त्यांनी दिलेला आहे.
दरम्यान, राज्यभरातील डॉक्टरांनी आज २४ तासांचा इशारा प्रशासनाला दिला आहे. जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मात्र २२ एप्रिलपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.