आंदोलनानंतर कामावरून कमी केलेले नसल्याचे स्पष्टीकरण
कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा भासत असताना ठाण्यात मात्र ग्लोबलच्या ५० डॉक्टर्स आणि २०० परिचारिकांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री या सगळ्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना कमी केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले. अर्थात, उरलेल्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयाच्या कामाची जबाबदारी येऊन पडली. पण हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून तूर्तास या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार नाही, असे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.
हे ही वाचा :
राष्ट्रनिर्माणासाठी गिरवा छत्रपती शिवरायांचे धडे
सरकारचा अजब कारभार; कोविड सेंटरमध्ये शिकाऊ वैद्यकीय तज्ज्ञ
महावितरण महाअडचणीत; ९१२ कोटींचा विलंब आकार भरण्यासाठी पैसे नाहीत
अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ
ठाणे पालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीवर डॉक्टर, परिचारिकांची भरती करण्यात आली होती. त्याअंतर्गत १८० डॉक्टर्स, ३०० परिचारिकांची भरती केली गेली. पण आता रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी हे कर्मचारी काम करत आहेत. कर्मचाऱ्यांचे पगारही कमी करण्यात आले होते. याचे पडसाद उमटले आणि या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा असताना असे कर्मचारी कमी केले गेले तर पुढे आयत्या वेळेस हे कर्मचारी उपलब्ध होणे कठीण होईल, असे बोलले जात आहे. जर आयत्या वेळेला कर्मचाऱ्यांची गरज भासली तर मात्र हे कर्मचारी या अनुभवामुळे सेवेत रुजू होण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल का, हे आता पाहावे लागेल.