ससून रुग्णालयातील डॉक्टर संपावर, या आहेत पाच मागण्या

ससून रुग्णालयातील डॉक्टर संपावर, या आहेत पाच मागण्या

कोरोनाचा उद्रेक सुरु असताना तिकडे पुण्याच्या ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. तातडीने बेड उपलब्ध करुन मनुष्यबळ वाढवा ही या डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप आहे. एका बेडवर २ ते ३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ससूनमध्ये बेडची कमतरता आहे. नवीन इमारतीत बेड उपलब्ध असूनही तिथल्या बेडचा वापर केला जात नाही.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पुण्यातील रुग्णालयात बेड्सची मोठी कमतरता भासत आहे. अशावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयात अजून ३०० बेड कोविड रुग्णांसाठी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ससूनमधील कोरोना रुग्णांसाठीच्या बेड्सची संख्या ५०० वरुन ८०० वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे- सरन्यायाधीश शरद बोबडे

चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, अनिल देशमुख प्रकरणी पडळकरांची टीका

माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना

काय आहेत पाच मागण्या?

१) मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे रुग्णांवरील उपचाराचं व्यवस्थापन कोलमडून जाईल.

२) बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ, साधनसामुग्री प्रशासनाकडे आहेत का?

३) दुसऱ्या लाटेची कल्पना डिसेंबर २०२० मध्येच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नाही

४) कोव्हिड ड्युटी करणाऱ्या डॉक्टर्सला क्वारंटाईन किंवा आयसोलेशन ची सुविधा नाही त्यामुळे आमचे ८० निवासी डॉक्टर्स एका महिन्यात कोरोनाने बाधित झाले.

५)आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून त्यावर कोणतेही उपाय केले गेले नाहीत.

Exit mobile version