लोकांना डोलो देऊन डॉक्टरांनी केली १ हजार कोटींची मज्जा

सर्वोच्च न्यायालयात एनजीओने केला आरोप

लोकांना डोलो देऊन डॉक्टरांनी केली १ हजार कोटींची मज्जा

कोरोनाच्या काळात डोलो ६५० या गोळ्यांचा खप प्रचंड होता. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी या गोळ्यांचा वापर करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पण या गोळ्यांचा खप वाढावा यासाठी या गोळ्यांच्या निर्मिती करणाऱ्या कंपनीनेच गोळ्या घेण्याच्या सूचना लोकांना करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल १ हजार कोटींच्या भेटी दिल्याचे आता समोर आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात फेडरेशन ऑफ मेडिकल सेल्स रिप्रेझेन्टेटीव्हच्या वतीने ऍडव्होकेट संजय पारीख यांनी सांगितले की, थेट करासंदर्भातील केंद्रीय मंडळाने डोलो ६५० ची निर्मिती करणाऱ्या कंपनीबद्दल ही माहिती दिलेली आहे. ते म्हणाले की, डोलो ६५० मधून भरपूर फायदा मिळावा यासाठी या गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना आमिषे दाखविली. सर्वोच्च न्यायालयाने हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के.एम. नटराज यांना १० दिवसांत आपली म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बोरिवलीत बिल्डिंग कोसळली; पण बरे झाले आधीच खरे खाली केली

समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात

अग्निवीर भरतीपूर्व परीक्षेत धावताना तरुण गतप्राण

 

सर्वसामान्यांना औषधे सुचविण्यासाठी डॉक्टरांना औषध कंपन्यांकडून आमिषे दाखविण्यात येतात. त्यामुळे त्यांना जबाबदार धरले पाहिजे, यास्तव ही याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. एकूण वैद्यकीय क्षेत्रात कशाप्रकारचा भ्रष्टाचार चालतो हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. औषध कंपन्यांच्या वतीने वकिलांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी.

Exit mobile version