भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या प्रतिमेवर सोशल मीडियाचा प्रभाव या विषयावर नील सोमय्या यांनी पीएचडी मिळवली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नील सोमय्या यांच्या यशाबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. ‘राजकीय पक्षाच्या प्रतिमेवर सोशल मीडियाचा प्रभाव’ या विषयावर नील सोमय्या यांनी पीएचडी केली आहे. डॉ. मकसूद अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली नील सोमय्या यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Dr Neil Somaiya, yes My Son @NeilSomaiya is awarded PhD Doctorate by University of Mumbai on his Thesis
"Impact of Social Media on Political Party Image……" @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/m9HJCTffC4
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 1, 2022
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाचा वारसा नेमका कोणाचा?
आणि पंतप्रधान मोदींनी चालवली गाडी