‘बंगालचे लोक ममतांना सत्तेतून हटवून त्यांचे गंगेत विसर्जन करतील’

कोलकाता बलात्कार प्रकरणावर सुकांता मजुमदार यांचे वक्तव्य

‘बंगालचे लोक ममतांना सत्तेतून हटवून त्यांचे गंगेत विसर्जन करतील’

कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून होत असून संबधित लोकांची कसून चौकशी सुरु आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेसचे नेते बंगाल पोलिसांचा बचाव करत आहेत आणि सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचवेळी, भारतीय जनता पक्ष (भाजप) कोलकाता प्रकरणाबाबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असून राज्यभर आंदोलन करत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी ‘ममता यांच्यावर टीका करत, बंगालचे लोक त्यांना गंगेत बुडवतील’ असे वक्तव्य केले आहे.

केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्याबद्दल पश्चिम बंगालचे लोक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून हटवतील आणि त्यांचे गंगा नदीत विसर्जन करतील. ममता सरकारच्या विरोधात पक्षाकडून राज्यभरात निदर्शने करण्यात येत असल्याची माहिती मंत्री मजुमदार यांनी दिली. सोमवारी (२६ ऑगस्ट) जन्माष्टमी असल्याने कोणतेही प्रदर्शन होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

आरोपी अभिनेत्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट, ७ अधिकारी निलंबित !

कोलकाता प्रकरण : पॉलीग्राफ चाचणीत अनेक धक्कादायक खुलासे

जम्मू काश्मीर: माजी एसएसपी मोहनलाल भगत यांचा भाजपमध्ये प्रवेश !

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस अडवत ओळख विचारून प्रवाशांवर झाडल्या गोळ्या

ते पुढे म्हणाले की, २७ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांचे आंदोलन होणार आहे. २८ ऑगस्ट रोजी धर्मतल्ला येथे आंदोक्लन करणार आहोत. पोलिसांकडे तशी परवानगी मागितली आहे, जर त्यांनी परवानगी दिली नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊ, असे मंत्री मजुमदार यांनी सांगितले. तसेच २९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या मागणी करिता प्रत्येक जिल्ह्यातील डीएम ऑफिसला घेराव घालू, २ आणि ४ ऑक्टोंबरला आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version