पीएफआयवर बंदी घाला, अजित डोवाल यांच्या उपस्थितीत कुणी केली मागणी?

पीएफआयवर बंदी घाला, अजित डोवाल यांच्या उपस्थितीत कुणी केली मागणी?

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बोलावलेल्या एका आंतरधर्मिय परिषदेत पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली पण ही मागणी कुणा हिंदुत्ववादी संघटनेने केलेली नाही.

अखिल भारतीय सुफी सज्जादनशीन परिषदचे (एआयएसएससी) प्रमुख नसीरुद्दीन चिश्ती यांनी पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, एखादी घटना घडते तेव्हा आम्ही निषेध करतो. काहीतरी करण्याची वेळ आली आहे. कट्टरतावादी संघटनांना लगाम घालणे आणि त्यांच्यावर बंदी घालणे ही काळाची गरज आहे. कोणतीही कट्टरपंथी संघटना असो, त्यांच्याविरुद्ध पुरावे असतील तर त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे असं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ही आंतर-धार्मिक बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध धर्मांच्या धार्मिक नेत्यांनी हजेरी लावली होती.

एआयएसएससी प्रमुख नसीरुद्दीन चिश्ती म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून धर्माऐवजी अधर्म होत आहे. देशाची गंगा जमुनी तहजीब कशी वाचवायची यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. आज आपल्या देशात तरुणांचे कट्टरपंथीकरण होत आहे. आपण धर्मगुरूंनी देशाला अशा कट्टरपंथी शक्तींपासून वाचवायचे आहे. हिंदुस्थान म्हणजे फुलांचा गुच्छ आहे. ज्यामध्ये सर्व धर्म आणि पंथाचे लोक राहतात. आता आम्ही जमिनीवर काम करू. प्रत्येक राज्यात असे कार्यक्रम आयोजित करणार, जेणेकरून देशात शांतता आणि सलोखा राखता येईल.

विचारसरणीच्या नावाखाली तेढ निर्माण होतेय

काही घटक भारताच्या प्रगतीला बाधा आणणारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते धर्म आणि विचारसरणीच्या नावाखाली तेढ आणि संघर्ष निर्माण करत आहेत. याचा संपूर्ण देशावर आणि देशाबाहेरही विपरीत परिणाम होत, असल्याचंही डोवाल यांनी म्हटलं.

हे ही वाचा:

मिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत ‘उचलले सोने’

अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

नसीरुद्दीन यांनी चांगली भूमिका मांडली

बैठकीत अजित डोवाल म्हणाले, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. नसीरुद्दीन चिश्ती साहेब खूप छान बोलले आहेत. आमची एकता अबाधित राहो. आपल्या देशाच्या प्रगतीचा लाभ प्रत्येक धर्म-धर्माला मिळायला हवा, पण काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. ते पुढे म्हणाले, जर आपल्याला याचा सामना करायचा असेल, तर आपल्याला जमिनीवर काम करावे लागेल, शांतपणे सहन करू नये. आपला निरोप घराघरात पोहोचवायचा आहे. आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे. देशाच्या प्रगतीत प्रत्येक धर्माचे योगदान आहे. १९१५ मध्ये, उलेमांनी अफगाणिस्तानमध्ये हंगामी सरकार स्थापन केले. त्याचे अध्यक्ष राजा महेंद्र पाल सिंह यांना करण्यात आले.

Exit mobile version