ग्राहक वस्तू खरेदी करत असताना कोणत्याच अमिषाला बळी पडू नये त्या वस्तूची पारख योग्य रीतीने करून घ्यावी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा करण्यात येतो. ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा. यासाठी विविध संघटना अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात. यासाठी १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो.
ग्राहक दिनाचे महत्व १५ मार्च १९६२ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे संबोधित केलेल्या भाषणांत तेथील ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, प्रतिनिधित्व, माहितीचा आणि निवडीचा असे चार हक्क प्रदान करण्यात आले. त्यानंतर जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा प्रतिनिधित्व करून मूलभूत गरज पुरवण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क , ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखीनही चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
वस्तू खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्ही काय काळजी घ्याल
फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
एम.आर.पी पेक्षा जास्त किमतीला वस्तू खरेदी करू नका.
कोणतीही वस्तू खरेदी केल्यास त्याचे बिल घ्यावे.
खाद्य पदार्थ विकत घेताना नीट पाहूनच घ्यावेत.
वस्तूची एक्सपायरी तारीख बघून खरेदी करावी.
सोने खरेदी करताना हॉलमार्क बघावे.
ऑनलाईन वस्तू घेताना नीट काळजी घ्या.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य आहे ते तपासा आणि मगच पेट्रोल भरा.
कुठलीही वस्तू विकत घेताना काळजीपूर्वक चौकशी करून घ्या.
हे ही वाचा:
आजपासून सुरू होणाऱ्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत हरीश साळवे काय बोलणार?
काय अवस्था आली पाहा!! पंजाब पोलिस आता लग्नातही वाजवणार बँड
अजित पवारांचा बुरखा फाटला; म्हणाले होते, जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही…
शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी साईनाथ दुर्गे अटकेत
आजच्या ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याच्या युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे आवश्यक आहे. ग्राहकांना याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. १९६० साली अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये
ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले. त्यासाठी जागतिक स्तरावर पाठपुरावा करून त्याला युनेस्कोने मान्यता दिली. म्हणूनच दरवर्षी १५ मार्च हा ‘जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.