…म्हणून व्हाॅट्सॲप, फेसबुक झाले होते बंद

…म्हणून व्हाॅट्सॲप, फेसबुक झाले होते बंद

काल म्हणजेच, सोमवार ५ ऑक्टोबर रोजी जगभरातील व्हॉट्सॲप (Whatsapp), फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instgram) बंद पडले होते. जगभरातील कोट्यावधी लोकांच्या जीवनातील महत्वाचे अंग असणाऱ्या या सोशल नेटवर्किंग साईट्स अचानक बंद पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. तर या सोशल साईट्स नेमक्या कशामुळे बंद पडल्या असतील याची चर्चा सुरू झाली.

वेबसाइट (Website), अँड्रोईड (Android) आणि आयओएस (Ios) यात तिनही प्रकारच्या सेवांमध्ये अडचणी जाणवत होत्या. तब्बल ६ तासांनंतर या सेवा हळू हळू पूर्ववत होऊ लागल्या. तेव्हा अनेकांचा जीव भांड्यात पडला. पण या सेवा नेमक्या बंद का झाल्या? हा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. फेसबुक, व्हाॅट्सॲप, इंस्टाग्रामच्या मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे या सेवा ठप्प झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी या सेवा बंद झाल्या होत्या.

हे ही वाचा:

माणसं जीवानिशी जात होती, पण लाचखोरी सुरू होती मुबलक

आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर

गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल

‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर

फेसबुकचे सिटीओ माईक श्रॉफर यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. “आम्हाला नेटवर्कींगच्या काही अडचणी येत आहेत. आमची तांत्रिक टीम त्यावर काम करत आहे. लवकरात लवकर जो काही बग (Bug) असेल तो (डीबग) करून सेवा पूर्ववत केली जाईल.” अशा प्रकारचे ट्विट त्यांनी केले आहे.

तर आता मंगळवार सकाळपासून या सेवा पूर्ववत झाल्या आहेत. फेसबुक कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी पोस्ट करत या संबंधीची माहिती दिली आहे. तर त्याने लोकांना जो त्रास झाला त्यासाठी दिलगिरीही व्यक्त केली आहे. “लोक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आमच्यावर किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत याची आम्हाला कल्पना आहे” असे झुकरबर्गने म्हटले आहे.

Exit mobile version