महिंद्रा ग्रुप, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेडचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचा आज जन्मदिवस. आज १ मे रोजी आनंद महिंद्रा हे त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आनंद महिंद्रा यांनी आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धीच्या जोरावर महिंद्रा ग्रुपला जागतिक मंचावर एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे.
आनंद महिंद्रा हे एक कुशल उद्योजक आणि करोडो लोकांसाठी एक प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे. याव्यतिरिक्त आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेक घडामोडींवर ते आपलं मत मांडतात. आपल्या सोशल मीडियाच्या सक्रीय सहभागातून ते अनेकांना मदतीचा हात पुढे करत असतात.
एक यशस्वी उद्योजक, सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
- आनंद महिंद्रा यांचा जन्म १ मे १९५५ रोजी मुंबईत झाला. आनंद महिंद्रा यांचे शालेय शिक्षण तामिळनाडूमधील लॉरेन्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढे त्यांनी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात आर्किटेक्चर आणि फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी एमबीएचे शिक्षण देखील घेतले आहे.
- आनंद महिंद्रा यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांना जहाज चालवायला आणि टेनिस खेळायला आवडते. तसेच ते एक उत्तम छायाचित्रकार देखील आहेत.
- २०११ मध्ये, त्यांनी मुंबईतील महिंद्रा ब्लूज फेस्टिव्हलच्या कल्पनेला चालना दिली. त्यानंतर हा फेस्टिव्हल वार्षिक कार्यक्रम बनला. या आशियातील सर्वात मोठ्या दोन दिवसांच्या कार्यक्रमात जगभरातील प्रसिद्ध संगीतकार सहभागी होतात. महिंद्रा समूह ‘महिंद्रा कबीरा’ या महोत्सवाचेही आयोजनही करतो.
- आनंद महिंद्रा यांनी भारतातील हार्वर्ड बिझनेस स्कूल असोसिएशनची सह-स्थापना केली. त्यांनी दिलेली १० दशलक्ष डॉलर देणगी ही परदेशी आस्थापनांना दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.
- आनंद महिंद्रा हे ‘नन्ही कली’चे संस्थापक आहेत. या प्रकल्पाअंतर्गत देशातील वंचित मुलींना प्राथमिक शिक्षण दिले जाते.
- आनंद महिंद्रा हे भारताच्या सामाजिक- आर्थिक विकासासाठी काम करणाऱ्या भारतीय धर्मादाय ट्रस्टचे आजीवन चेअरमन आहेत.
- नागरिकांना सुरक्षित पेयजल मिळावे यासाठी लागणाऱ्या प्रकल्पासाठी आनंद महिंद्रा यांचे समर्थन आणि मदत उल्लेखनीय होती. यामुळे देशभरातील ग्रामीण भागातील ३ दशलक्ष लोकांना लाभ झाला.
- आनंद महिंद्रा हे ARAI (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ARAI सुरक्षित, अधिक कार्यक्षम आणि कमी प्रदूषण करणारी वाहने विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे.
- आनंद महिंद्रा यांनी २०२० मध्ये महिंद्रा विद्यापीठाची स्थापना केली आहे.
हे ही वाचा: