काय आहे लाईफ ऑफ ‘पाय’?

जाणून घ्या का साजरा करतात हा दिवस

काय आहे लाईफ ऑफ ‘पाय’?

आपल्या दैनंदिन जीवनात गणित किंवा आकडेमोडीचे महत्व सगळ्यांनाच आहे. तुम्ही कितीही आधुनिक असाल तरी रोजच्या व्यवहारांत तुम्हाला आकडेमोड येणे आवश्यकच आहे. हेच आपल्या रोजच्या जीवनात गणिताचे महत्व ओळखण्यासाठी आणि गणिताचे जगभर कौतुक होण्यासाठी आज १४ मार्च ला गणित  प्रेमींद्वारे पी आय (π) अर्थात पाय दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर अनेक शाळा, विद्यालये, आणि गणितीय संस्थांद्वारे हा आजचा दिवस गणिताचे शिक्षण आणि जागरूकता होण्यासाठी (π) हा दिवस साजरा करतात. १४ मार्चला गणितीय स्थिरांक (π) पाय (३. १४) ओळखण्यासाठी साजरा करतात.आज मार्च हा वर्षाचा तिसरा महिना आहे.आणि तारीख १४ आहे.  जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनचा वाढदिवस सुद्धा आजच्या दिवशी म्हणजे १४ मार्च १८७९ ला असतो

गणितातील पायची (π) किंमत २२ भागिले सात किंवा तीन पूर्णांक १४ अशी असते. पाय (π) हा वर्तुळाच्या परिघाचा व्यास आणि त्याचे गुणोत्तर परिभाषित करतो म्हणून आजचा दिवस पाय (π) डे म्हणून साजरा करतात. या वर्षी २०२३ ची पाय (π) डे ची संकल्पना हि “प्रत्येकासाठी गणित” हि आहे.    गणित आणि भौतिक तज्ज्ञांसाठी आजचा दिवस विशेष मानला जातो. जागतिक स्तरावर आजचा दिवस (π) साजरा केला जातो. विशेषतः अमेरिकेत हा दिवस आज साजरा करतात. १९८८ साली भौतिक शास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी सगळंयात पहिल्यांदा सॅन फ्रान्सिस्कोमधील एक्सप्लॉरेटोरियम मध्ये पाय (π) दिवसाचे आयोजन केले होते. लॅरी यांना “द प्रिन्स ऑफ पाय” अशा नावानेसुद्धा ओळखतात.

हे ही वाचा:

आजपासून सुरू होणाऱ्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत हरीश साळवे काय बोलणार?

काय अवस्था आली पाहा!! पंजाब पोलिस आता लग्नातही वाजवणार बँड

अजित पवारांचा बुरखा फाटला; म्हणाले होते, जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही…

शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी साईनाथ दुर्गे अटकेत

संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींनी १४ मार्च हा दिवस २००९ सालापासून(π) पाय दिवस साजरा करायला सुरवात केली. त्याआधी पाय (π) दिवस हा २२ जुलै रोजी साजरा करत असत. कारण पायची दुसरी किंमत हि बावीस सप्तमांश आहे. पायचा उपयोग हा सहसा नद्यांची लांबी मोजण्यासाठी करतात. शिवाय पिरॅमिडचा आकार सुद्धा पाय नि मोजला जातो. पाय (π)मुळे आपण आपल्या ब्रह्माण्डाचा आकार अंडाकार आहे या तर्कापर्यंत पोचलो आहोत.

भारतीय विद्यार्थांचा पराक्रम

मार्च २०१५ मध्ये गणिताच्या एका वर्गात पी आयचे सर्वात जास्त अंक कोणाला आठवतात अशी ऑन लाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्ही आय टी विद्यापीठ वेल्ल्लोर इथल्या राजवीर मीना या २१ वर्षीय विद्यार्थ्याने पी आय चे तब्बल ७०००० अंक लक्षात ठेवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता हा खरोखरच उल्लेखनीय पराक्रम असून त्याला ते आकडे आठवायला दहा तास लागले होते.  स्पेस विज्ञानात पायचा वापर मोठ्या प्रमाणांत केला जातो. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी पायच्या निश्चित मूल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अजूनही कोणाला त्याचा शोध लागला नाही.

Exit mobile version