राहुल गांधी तुम्ही हिंदू धर्म मानता की नाही?

राहुल गांधींच्या दौऱ्यात रायबरेलीमध्ये लावण्यात आले पोस्टर्स

राहुल गांधी तुम्ही हिंदू धर्म मानता की नाही?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मंगळवारी (९ जुलै) त्यांचा लोकसभा मतदारसंघ रायबरेली येथे पोहोचले आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या रायबरेली दौऱ्याच्या निषेधार्थ अनेक हिंदू संघटनांनी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत राहुल गांधी तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याचे उत्तर द्या?, अशा मजकुराचे परिसरात पोस्टर लावण्यात आले आहेत.

हिंदूंना हिंसक म्हटल्याने संतप्त लोकांनी हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये लिहिले आहे की, ‘रायबरेलीच्या हिंदू मतदारांनी हिंदूंना हिंसक म्हणण्यासाठी तुम्हाला मतदान केलेले नाही, राहून गांधी तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याचे उत्तर द्या. अशा मजकुराचे पोस्टर परिसरात जागोजागी लागले आहेत. राहुल गांधींच्या विरोधातल्या पोस्टर सर्वत्र चर्चा होत आहे.

हे ही वाचा:

हाथरसची घटना घडली तेव्हा भोले बाबाचे सेवक पळून गेले!

मंत्रालयात जेष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

हाथरस एसआयटी अहवालानंतर सहा अधिकारी निलंबित

प्रिय राहुल भाई… रोहित शर्माचं प्रशिक्षक राहुल द्रविडला भावनिक पत्र

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सभागृहात म्हटले होते की, ‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते २४ तास हिंसा आणि द्वेष करतात. तुम्ही अजिबात हिंदू नाही. राहुल गांधीच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी उभे राहून निषेध व्यक्त केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले होते.

दरम्यान, रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते दुसऱ्यांदा रायबरेलीला भेट देत आहेत. येथे ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. यानंतर ते जिल्ह्यातील विकासकामांवर चर्चा करणार आहेत.

Exit mobile version