केंद्र सरकार म्हणते, घरबसल्या दिवाळी खरेदी करा!

केंद्र सरकार म्हणते, घरबसल्या दिवाळी खरेदी करा!

Shopping online concept - Parcel or Paper cartons with a shopping cart logo in a trolley on a laptop keyboard. Shopping service on The online web. offers home delivery.

भारतामध्ये दिवाळी हा सण सर्वच भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी म्हटल्यावर बाजार अक्षरशः फुलून जातो. सणासुदीचे दिवस आले, घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असला, किंवा लग्नसराई सुरू झाली की खरेदीची धामधूम सुरु होते. केवळ सण-समारंभच कशाला, एरवी देखील काही ना काही कारणांनी आपली खरेदी सुरूच असते.

कोरोनाचा एकूणच प्रादुर्भाव पाहता, केंद्र सरकाकरने आता ऑनलाईन खरेदी करावी असे म्हटले आहे. रशिया, ब्रिटन तसेच चीनसारख्या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. त्यामुळेच आता बाजारात जाऊन खरेदीसाठी गर्दी करू नका असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.

स्वतः बाजारामध्ये जाण्यापेक्षा घरबसल्या वस्तू घेण्यावर भर द्यावा याकरता आता सरकारने नियमावली जाहीर केलेली आहे. आताच्या इंटरनेटच्या युगामध्ये कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडायची तितकीशी गरज भासत नाही.

 

हे ही वाचा:

भारतीय संघाला बाबर घाबरला का?

संजय राऊत, ट्विट करण्यापूर्वी व्हिडीओची सत्यता तर पडताळा!

संजय राऊत यांनी नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी?

‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’

 

फर्निचर पासून ते अगदी भाजीपर्यंत सगळे एका “क्लिक” मध्ये घरबसल्या मागवण्याची सोय आता आहे. कपडे, दाग-दागिने तसेच आधुनिक विद्युत उपकरणे सगळे ऑनलाईन सहज उपलब्ध आहे. इतकेच कशाला, परदेशातून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू आपण ऑनलाईन खरेदी करून मागवू शकतो. त्यातूनही बऱ्याच वेबसाईट्स वर खरेदी करताना अनेक आकर्षक ऑफर्स किंवा डिस्काउंट मिळत असल्यामुळे खरेदीचा आनंद दुणावतो. पण ऑनलाईन खरेदी करताना काही गोष्टी आपण विचारात घेऊन मग खरेदी केल्यास आपण “ऑनलाईन ग्राहक” बनतानाच “स्मार्ट ग्राहक” पण होऊ शकतो.

Exit mobile version