बदलापूरमध्ये चार वर्षांच्या मुलींवर झालेला अत्याचार हा मन हेलावून टाकणारा आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकार या विषयात अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणामध्ये राजकारण करू नये. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते दिल्लीत बोलत होते.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणचे आरोपपत्र तत्काळ न्यायालयात दाखल झाले पाहिजे, अशा सूचना पोलीसंना देण्यात आल्या आहेत. आरोपी नराधमाला कठोरातली कठोर कारवाई कारवाई व्हावी, हा सरकारचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात झाली आहे. घटना १३ ऑगस्टला घडली. या प्रकरणात काही दिरंगाई झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष होणार नाही, दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा..
आग्र्यात स्कुटी चालविणाऱ्या मुलीचा पाठलाग; युसूफ, फिरोजला अटक
हाथरस, उन्नाव बलात्कार प्रकरणे हाताळणाऱ्या महिला अधिकाऱ्यांकडे कोलकाता प्रकरण !
संतप्त बदलापूरकरांकडून शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकात पोलिसांवर केली दगडफेक
कासीम पठाणच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या
गृहमंत्री फडणवीस म्हणाले, यामध्ये राजकारण करणे योग्य नाही. मात्र विरोधी पक्ष यांच्या संवेदना बोथट झाल्या असल्यामुळे त्यांच्याकडून राजकारण केले जात आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अशा प्रकरणामध्ये राजकीय वागू नये. जनतेला दिलासा कसा देता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा. मात्र खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे राजकारण करत असल्याचे फडणवीस म्हणाले.