आरेमध्ये एकही झाड नव्याने तोडलेले नसून फक्त फांद्या कापल्या आहेत, असे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला स्पष्ट केले आहे. आरे दुग्ध वसाहतीतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी वृक्षतोड करण्यात आल्याची याचिका पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज, ५ ऑगस्टला सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने, पुढील सुनावणीपर्यंत आरेमधील एकही झाड तोडू नये असे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळित, अनिरुद्ध बोस आणि एस रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तुषार मेहता यांनी मुंबई मेट्रोची बाजू मांडली. मेट्रो-३ कारशेडसाठी कोणतीही वृक्षतोड केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, नोव्हेंबर २०१९ मध्ये जैसे थेचे आदेश दिल्यानंतर एकही झाड तोडलेले नाही. २०१९ नंतर फक्त काही झुडपे, तण वाढली होते ते कापण्यात आले आहे. शिवाय, काही झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. कोणतेही झाड तोडलं नसल्याचा दावा मुंबई मेट्रोकडून करण्यात आला आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणी बुधवारी, १० ऑगस्ट रोजी होईल असं सांगितलं आहे. तोपर्यंत कोणतेही वृक्ष तोडले जाऊ नये, असे न्यायालायने सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर होईल यासंदर्भातील निर्णय सरन्यायाधीश घेतील असं सुद्धा न्यायालयाने सांगितलं आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मेट्रो- ३ कारशेडचा निर्णय सर्वात पहिला घेतला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेडच्या कामावर स्थगिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीचं आरे मेट्रो-३ कारशेडवरील बंदी उठवली आहे.