32 C
Mumbai
Thursday, April 10, 2025
घरविशेषलोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा

लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे आवाहन

Google News Follow

Related

मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यामध्ये काही दुमत नाही. पण त्यापुर्वी लोककला मधून नाटक या कलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरु आहेत. त्यामुळे याबाबत एक सर्वंकष अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. या कामी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज येथे केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाचा समारोप आज मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा येथे संपन्न झाला. समारोप प्रसंगी नाट्य जागर मधील विजेत्या ३ विशेष एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा..

तेलंगणा: रमजानमुळे काँग्रेस सरकारने दहावीच्या परीक्षेत केला बदल!

रेल्वे ट्रॅकवर लोखंडी बोल्ट आणि दगड ठेवणाऱ्या इबादुल्ला आणि अन्वरुलला अटक!

‘संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली!’…रोहित पवारांनी केला दावा

मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याची वाघाशी झुंज

यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, नाट्य परिषदेने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने विविध भाषांमधील नाटकांचा महोत्सव आयोजित केला हे अत्यंत स्तुत्य उपक्रम असून विविध भाषांमधील विचार, नाटक, काव्य, कथा आणि त्यातील सांस्कृतिक विविधता याचे अदान प्रदान होणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही नेहमीच अन्य भाषेतील शब्द सामावून घेतच आली आहे तसेच मराठी भाषेतील अनेक शब्द अन्य भाषांनी ही लिलया सामावून घेतले आहेत. आपले मराठी नाटक हे शंभर वर्षांहून मोठी परंपरा असलेले आहे. विष्णुदास भावे यांनी नाटकाचा रंगमंचावरील पहिला अविष्कार सादर केला यात काही दुमत नाही. पण आता नवनवीन माहिती समोर येत असून लोककलांमध्ये नाटकाची मुळे आहेत असे लेखन समोर येते आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संशोधन करण्यासाठी एखादा अभ्यास गट नाट्य परिषदेने स्थापन करुन याबाबत संशोधन करावे सरकार या कामी पुर्ण मदत करेल, असे ही आश्वासित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा