उदयनिधी सावधान! द्रमुकच्याच खासदाराने दिला इशारा !

उदयनीधींनी आपल्या विधानाची जाणीव ठेवावी, टीआर बालू

उदयनिधी सावधान! द्रमुकच्याच खासदाराने दिला इशारा !

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना आजारांशी केल्याच्या वादानंतर द्रमुक खासदार टीआर बालू यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या विधानांबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.तसेच उदयनिधी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सावध पावले उचलण्यास सांगितले.

उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांशी तुलना करत त्याचे निर्मूलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली होती.आता द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) कोषाध्यक्ष आणि खासदार टीआर बालू यांनी देखील डीएमके युथ विंगचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सावधानतेचा इशारा देत त्यांच्यावर टीका केली आहे.

सोमवारी, मुपेरम विझा २०२३ या एका कार्यक्रमाला संबोधित करताना बालू यांनी भाष्य केले ते म्हणाले, “संपूर्ण देश DMK युवा विंग प्रमुखाला घाबरत आहे, ते पुढे काय करतील याचा विचार करत आहेत.ते पुढे म्हणाले,उदयनिधीला फक्त आपल्या वडिलांची भीती वाटते,आपण नंतर सर्व व्यवस्थित करू शकतो या आशेने तो काहीही बोलत आहे परंतु मी त्याला सावध करतो की आपल्या हातात धरलेली वस्तू याची खात्री करणे हे त्याचे कर्तव्य आहे.तसेच उदयनिधींनी आपल्या विधानाची जाणीव ठेवण्याचा इशारा देखील दिला आहे.द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय व्यक्तिमत्त्व कलैग्नार करुणानिधी, पेरारिग्नार अण्णा आणि पेरियार यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता तेव्हा द्रमुकचे टीआर बालू बोलत होते.

हे ही वाचा:

सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

रामदेव बाबांकडून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अग्रलेख !

रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे

पेट्रोल भाववाढीने खचलेल्या पाकिस्तानने काढला ‘इराणी’ पेट्रोल पंपांवर राग

उदयनिधी स्टॅलिन अजूनही आपल्या विधानावर ठाम
मागील काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची उपमा “मलेरिया” आणि “डेंग्यू” यांच्याशी केली होती आणि त्याचे निर्मूलन करण्याचे आवाहन केले होते.सनातन धर्म जातिव्यवस्था आणि भेदभावावर आधारित असल्याचे ते म्हणाले होते.”सनातनाला विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे. सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे,” असे मंत्री म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतरही, उदयनिधी म्हणाले की, ते त्यांच्या शब्दांवर ठाम आहेत.

Exit mobile version